नांदेड: शहरातील चांदोजी पावडे मंगल कार्यालयासमोर भरधाव कारने एकास उडविले. ही घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. मयत तरुणाचे नाव चांदू रघुनाथ सूर्यवंशी रा.दर्यापूर असे असून तो विश्वनाथ अप्पा हुरणे ज्युनियर कॉलेज मध्ये सेवक म्हणून कार्यरत होता.
शुक्रवारी सकाळी कॉलेजला जात असताना चांदू सूर्यवंशी यांना छत्रपती चौक कडून डीमार्टकडे जाणाऱ्या कारने (एमएच 26 एएफ 392 ) उडविले. चांदू सूर्यवंशी यांना एवढी जोराची धडक बसली की तो चेंडु सारखा उडून हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ऑटोवर पडल्याने ऑटोचा चुराडा झाला. या घटनेनंतर जमावाने कारची मोठ्याप्रमाणात तोडफोड केली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. आहेत घटनेची माहिती मिळताच दर्यापूर येथील युवक आणि मयताच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी येऊन मोठ्याप्रमाणात आक्रोश सुरु केला.