शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदेंनी 'करून दाखवलं', विधानसभेत जे बोलले होते, तसंच झालं! उद्धव ठाकरेंना जबर धक्का
3
नैसर्गिक युती तोडल्याचा जनतेच्या मनात राग, महायुतीच्या निकालानंतर विनोद तावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!
4
मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?
5
बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...
6
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
7
Ramtek Vidhan Sabha Election Result 2024: ठाकरेंच्या शिवसेनेला रामटेकमध्ये जबर हादरा!
8
Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"
9
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
10
कोकणात महायुतीची जोरदार मुसंडी, तब्बल ३३ जागांवर आघाडी, ठाकरेंना मोठा धक्का
11
हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी
12
मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर फेल, मतदारांचा महायुतीला भक्कम पाठिंबा...
13
Maharashtra Assembly Election Result 2024: पुन्हा निवडणूक घ्या, हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही; संजय राऊत संतापले 
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
15
Maharashtra Assembly Election Result 2024:  शिंदेंच्या शिवसेनेची घौडदौड! श्रीकांत शिंदे म्हणाले, "१८-२० तास काम करणारे मुख्यमंत्री..."
16
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही"; शिंदेंनी मानले लाडक्या बहिणींचे आभार
17
Maharashtra Election Result: "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी राऊतांची स्थिती"! शिवसेना शिंदे गटाचा टोला
20
शोभिता धुलिपालासोबत नवीन प्रवास सुरू करण्यासाठी नागा चैतन्य उत्सुक, म्हणाला- "कमतरतेला ती..."

तुमचे ५० खोके अन् आमचे १०५ डोके; बॅनरबाजीतून फडणवीस समर्थकांचा शिंदे सेनेवर निशाना

By शिवराज बिचेवार | Published: June 16, 2023 5:52 PM

या बॅनरनंतर शिंदे गट आता काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नांदेड : राज्यात शिंदे सेना आणि भाजपात सर्व काही आलबेल नाही हे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या एका जाहिरातीतून दिसून आले. त्यानंतर राज्यभरात शिंदे आणि फडणवीस समर्थकांनी बॅनरबाजी करून एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले हाेते. त्यातून दोघांमध्ये वितुष्ट वाढतच गेले. त्यावर गुरुवारी दोघांनीही सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला. परंतु हा वाद आता वाढतच गेला असून, त्याचे पडसाद शुक्रवारी नांदेडातही उमटले. आयटीआय चौकात देवेंद्र फडणवीस समर्थकांनी ५० खोके आणि १०५ डोके अशा आशयाचे बॅनर लावले. त्यात चाणक्यचा फोटो आणि शेजारी पन्नास डोकी वापरण्यात आला. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. 

शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपशी घरोबा केला. शिंदे गटाच्या पन्नास आमदारांचा सत्तेत सहभाग आहे. नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली, तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले होते. तेव्हापासूनच भाजपचे आमदार आणि समर्थकांमध्ये नाराजी आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी शिंदे समर्थकांनी माध्यमांमध्ये एका सर्वेक्षणाची जाहिरात दिली. त्यानुसार राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता अधिक असल्याचे आकडे छापण्यात आले. 

तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या छायाचित्राचाही विसर पडल्याची टीका त्यानंतर झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सारवासारव करण्यासाठी पुन्हा जाहिरात देण्यात आली. त्यात बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या फोटोसह शिंदे गटाच्या मंत्र्यांचे छायाचित्र छापण्यात आले. तसेच आकडेवारीचाही उल्लेख केला नव्हता. परंतु या दोन्ही दिवसांच्या जाहिरातीत शिंदे राज्यात आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. त्यावरून भाजपच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली होती. भाजप समर्थकांनी उघडपणे नाराजी व्यक्त करीत राज्यातील अनेक शहरात बॅनरबाजीही केली होती. त्यातच फडणवीस यांनी शिंदे यांच्यासोबत कार्यक्रमाला उपस्थितीही टाळली होती.

परंतु गुरुवारी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मात्र शिंदे आणि फडणवीस एकाच हेलिकॉप्टरने कार्यक्रमस्थळी पोहोचले. दोघांचाही व्यासपीठावर वावर सहज होता. भाषणातही एकमेकांचा त्यांनी लोकप्रिय असा उल्लेख केला, तर शिंदे यांनी येे फेव्हिकाॅल का जोड है तुटेगा नही, अशी डायलॉगबाजी केली. त्यामुळे या वादावर पडदा पडल्याचे दिसून येत होते. परंतु शुक्रवारी आयटीआय चौकात फडणवीस समर्थकांनी ५० खोके आणि १०५ डोके अशा आशयाचे बॅनर लावले. त्यावर चाणक्य आणि पन्नास डोकी तसेच खाेक्यांचे छायाचित्र वापरण्यात आले. त्यामुळे हा वाद आता आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. या बॅनरनंतर शिंदे गट आता काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाNandedनांदेड