लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : धान्य घोटाळा प्रकरणात पोलिसांनी भक्कम पुरावे जमा केले असून या घोटाळ्यासंदर्भात पोलिसांनी विभागीय आयुक्ताकडे सादर केलेल्या तेरा पानी अहवालात अनेकांचे बारा वाजण्याची शक्यता आहे़ दरम्यान, जप्त केलेल्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयात कुठलीही नोंद नसल्याचा धक्कादायक प्रकारही चौकशीत पुढे आला आहे़कृष्णूर एमआयडीसीमधील गोदामात शासकीय धान्य मोठ्या प्रमाणात पाठविण्यात येते़ या घोटाळाबाबत पोलिसांनी धान्य वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनाचे जीपीएस रेकॉर्ड जमा केले आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी टोल नाक्यावरीवरील सीसीटीव्हीचे ३५ फुटेजची तपासणी केली आहे. हे सर्व रेकॉर्क मागील ६ महिन्यापासूनच आहेत. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात येणार आहे. दरम्यान २०१७ मध्ये झालेल्या गोदाम तापसणीवर ही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. माहिती अधिकारातून ही बाब उघडकीस आली आहे.धान्य घोटाळा प्रकरणात आतापर्यंत फक्त १० ट्रक चालक यांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी मात्र अद्याप फरार आहेत. मेगा अॅग्रो चे अजय बाहेती आणि व्यवस्थापक यांच्यासह इतर मंडळींवर कारवाई झाल्यानंतर या प्रकरणाचा खºया अर्थाने उलगडा होणार आहे़ मुख्य म्हणजे या प्रकरणात महसुलने सर्व जबाबदारी गोदामपाल व वाहतूक ठेकेदारावर असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे यामध्ये बळी कुणाचा द्यायचा याची तयारी सध्या सुरू असल्याचे दिसत आहे़ या प्रकरणात पोलिसांनी विभागीय आयुक्तांना तेरा पानांचा अहवाल दिला आहे़ या अहवालाची प्रतिलिपी जिल्हाधिकारी यांना दिली असून त्यात सदर घोटाळ्याच्या संदर्भातील सर्व माहिती असल्याचे समजते़ दरम्यान, शुक्रवारी नवीन पोलीस अधीक्षक संजय जाधव हे नांदेडात रूजू होत असून त्यांच्यासमोर या प्रकरणाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आहे़---धान्य घोटाळ्यात मोठी साखळीपोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी उघड केलेल्या धान्य घोटाळ्यात मोठी साखळी असल्याचे दिसून येत आहे़ घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भाने आरोपींच्या मोबाईलचे सीडीआर काढले असून त्यात अनेक राजकीय पुढाºयासह काही पोलीस अधिकाºयांची नावे पुढे येत आहे़ तपासाअंती त्यातील बडे मासे गळाला लागतील़
तेरा पानांमध्ये वाजणार बारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:45 AM
धान्य घोटाळा प्रकरणात पोलिसांनी भक्कम पुरावे जमा केले असून या घोटाळ्यासंदर्भात पोलिसांनी विभागीय आयुक्ताकडे सादर केलेल्या तेरा पानी अहवालात अनेकांचे बारा वाजण्याची शक्यता आहे़ दरम्यान, जप्त केलेल्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयात कुठलीही नोंद नसल्याचा धक्कादायक प्रकारही चौकशीत पुढे आला आहे़
ठळक मुद्देधान्य घोटाळा : विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर