दुचाकीची चोरी
नांदेड : जैतापूर ता. नांदेड येथील भीमराव कोल्हे यांची एम.एच.३८-के.३६७२ या क्रमांकाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली. इतवारा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
लसीकरण मोहीम
हदगाव : कवाना उपकेंद्रात माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसपुरे यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी डॉ. प्रशांत मेरगेवाड, बबनराव कदम, गजानन अनंतवार, आरोग्य सेविका आडे, आशा सेविका फुले उपस्थित होत्या.
बंडू काटकर निवृत्त
हिमायतनगर : येथील पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी बंडू काटकर ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी नांदेड, कंधार, लोहा, हदगाव, मुखेड, नायगाव आणि हिमायतनगर आदी तालुक्यात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि कृषी विस्तार अधिकारी आदी विविध पदावर कार्य केले. काटकर यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला.
कावळगावला लसीकरण
देगलूर : कावळगाव आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरणाचा शुभारंभ देगलूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आकाश देशमुख यांच्या हस्ते झाले. प्रथम लस सेवानिवृत्त शिक्षक गणपत कावळगावकर यांनी घेतली. यावेळी मारोती वाडेकर, डॉ.सुनील आक्केमवाड, आरोग्य सेविका एस.सी. कांबळे, एल.एम. वळगे, आशा वर्कर झुडपे, सरस्वती फुलारी, माजी सरपंच बाळासाहेब देशमुख, धोंडीबा गायकवाड, मारोती शिरगीरे, माधव वाडेकर, चंदू राजुरे, हणमंत धुळेकर, बजरंग धुळेकर, माधव धुळेकर आदी उपस्थित होते.
वानखेडे सेवानिवृत्त
नायगाव : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कृष्णूरचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुधाकर वानखेडे सेवानिवृत्त झाले. त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख ढगे, आचेवाड, मिरासे व इतर शिक्षक उपस्थित होते. त्यांना प्राथमिक शिक्षक संघाचे देवीदास बस्वदे, चंद्रकांत मेकाले, अशोक पाटील, प्रल्हाद राठोड, विश्वंभर कागळे यांनी शुभेच्छा दिल्या.
एकबाल शेख रुजू
धर्माबाद : येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकबाल शेख पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. त्यांना कोरोना झाला होता. यावर मात करून शेख रुजू झाले. त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. पंडित, डॉ. केशटवार, डॉ. पूजा आरटवार, डॉ. असद, एम.व्ही. झुंबड, निलेवाड, श्रीमती कल्याणी, बालाजी चव्हाण, एन.एम. गोविंदवार, शिवराज उखाणे, दिनकर तुलसवाड, बाबुराव ठिगळे, शेख अमजद, सोनटक्के आदी उपस्थित होते.
अवैध दारू जप्त
देगलूर : देगलूर पोलिसांनी १ हजार २५० रुपयांची अवैध दारू जप्त केली असून गुन्हा नोंदवला आहे. विनापरवाना चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी दारू बाळगण्यात आली होती.
बीडीओंची भेट
फुलवळ : कंधारचे बीडीओ कैलास बळवंत, विस्तार अधिकारी टी.टी.गुट्टे, आरोग्य विस्तार अधिकारी सोनकांबळे यांनी १ एप्रिल रोजी फुलवळ येथे भेट दिली. यावेळी त्यांनी विविध योजनांची माहिती घेतली. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी पोटेवाड, ऑपरेटर मंगनाळे, रोजगार सेवक इब्राहिम पठाण आदी उपस्थित होते.