बंगालमधील हिंसाचाराचा निषेध
देगलूर - तालुका भाजपाच्या वतीने बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रशांत दासरवार, ओम हंगरगेकर, माधव पाळेकर, गंगाधर दाऊलवार, मुकुंद भुताळे, जयवर्धन कांबळे, दत्ता टाकळे, किशोर मठपती, शिवम वाडीकर आदी उपस्थित होते.
बोडके यांना निरोप
बिलोली - अटकळी येथील किशोर विद्यालयातील शिक्षक पी.जी.बोडके सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय शेळगावकर होते. प्रास्ताविक उत्तम रुमाले यांनी केले. यावेळी बळीराम जाधव, संभाजी पाटील, मुख्याध्यापक दबडे, कानवले, विभुते, उपसरपंच डोंगरे, शिवाजी डोंगरे, प्रदीप जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक रावसाहेब ताटे यांनी केले.
नारळ पाण्याची मागणी वाढली
हदगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नारळ पाणी घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. जवळपास दिवसभरात ३०० ते ५०० नारळ पाणी विक्री होते. सर्वच आजारांसाठी नारळ पाणी आवश्यक समजले जाते. दिवसाकाठी २०० ते ३०० रुपये नफा होत असल्याचे नारळ पाणी विक्रेत्यांनी सांगितले.
मुख्याध्यापकपदी पालेजवाड
नांदेड - होळी येथील प्रज्ञा निकेतन हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी आर.एन. पालेजवाड यांची नियुक्ती झाली. शिक्षणाधिकारी सलगर यांनी स्वतचे अधिकार वापरून ही नियुक्ती केली. ४ मे रोजी शाळेत जाऊन शिक्षणाधिकारी सलगर, उपशिक्षणाधिकारी बनसोड, अधीक्षक गंजेवार यांनी चौकशी केली आणि आपल्या अधिकारात मुख्याध्यापकांची नियुक्ती केली.
एसबीआय बँकेसमोर गर्दी
कंधार - भारतीय स्टेट बँकेच्या कंधार शाखेत ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. सकाळी १० वाजतापासून वृद्ध नागरिक पेन्शन उचलण्यासाठी रांगेत उभे असतात. ६ मे रोजी भर उन्हात रांगा लागल्या होत्या. यामध्ये ८० वर्षीय वृद्ध व्यक्ती सहभागी होती. दुसरीकडे कोरोना नियमांचे उल्लंघनही मोठ्या प्रमाणात झाले.
पिकअप गाडीचा अपघात
नरसी - नांदेड ते हैदराबाद रोडवरील आदित्य मंगल कार्यालयाजवळ पिकअप गाडी पुलावर आदळल्याची घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. चालक किरकोळ जखमी झाला असून, त्याला नायगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुलाच्या वरचा भाग ५० टक्के तुटला. रामतीर्थ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
प्रल्हाद पवळे सेवानिवृत्त
कंधार - मौजे गोणार येथील पदोन्नत मुख्याध्यापक प्रल्हाद पवळे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. त्यांना लोहा तालुक्याच्या वतीने गुरुगौरव तसेच जिल्हास्तरीय गुरुगौरव पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. निरोप कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
३०० लसींचे उद्दिष्ट
अर्धापूर - अर्धापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ ते ४४ वयोगटातील ३०० व्यक्तींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तहसीलदार सुजित नरहरे, बीडीओ मीना रावताळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. ऑनलाईन नोंदीनुसार या केंद्रावर लस दिली जात आहे.
अवकाळी पावसाने नुकसान
हदगाव - तालुक्यासह बरडशेवाळा, बामणीफाटा, पळसा, मनाठा, हरडफ परिसरात ६ मे रोजी सायंकाळी अवकाळी पाऊस पडला. यामुळे फळबागासह पिकांचे मोठे नुकसान झाले. घरावरील पत्रे उडाली. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला.
गरिबांना अन्नदान
अर्धापूर - वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अर्धापूर येथे गरिबांना अन्नदान करण्यात आले. तालुकाध्यक्ष आनंदराव शिनगारे यांनी हा उपक्रम राबविला. यावेळी प्रसाद पाटील, ज्ञानदीप साखरे, सुरेश सावते, मारोती पाटील, देवानंद कांबळे, ज्ञानेश्वर कदम, नागेश खंदारे, नितीन गोडबोले, बंटी माटे आदींचीही उपस्थिती होती.
रक्तदान शिबिर
किनवट - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी सुभाष धनवे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, जिल्हा संघ चालक संतोष तिरमनवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक नेम्मानीवार, तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, अनिरुद्ध केंद्रे, उमाकांत कऱ्हाळे, विठ्ठलराव मच्छर्लावार, संतोष रायेवार, दत्ता जायभाये, अनिल भंडारे, दिलीप पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी चंद्रकांत नेम्मानीवार, प्रवीण श्रीमनवार, आशुतोष बेंद्रे, विनायक ठोंबरे, शुभम काळे, आदर्श राणे आदींनी परिश्रम घेतले.
वीजतारांचा धोका वाढला
भोकर - शहरातील विविध भागातील वीजतारा लोंबकळत असल्यामुळे या तारांचा स्पर्श होऊन अपघाताची शक्यता वाढत आहे. अनेक तारा कित्येक दिवसापासून लोंबकळत आहेत. यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागात उकाडा वाढला
धर्माबाद - तालुक्यातील विविध भागात तापमान जवळपास ४० अंश से. झाले असून, उकाडा वाढल्याने मशागतीची कामेही ठप्प पडली आहेत. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी पाळी, नांगरणी आदी कामावर भर देत आहेत. मात्र उन्हामुळे ही कामे ठप्प झाली आहेत.