नांदेड : देशात युवकांना, युवकांया संघटनांना बोलण्यावर बंदी घातली जात आहे. अनेक युवक नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. मतदान करण्याचा अधिकार संविधानाने दिला असला तरी तो अधिकार हिरावूृन घेण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. त्यामुळे पहिल्यांदा मतदान करणा-या तरुणांनी आपले पवित्र मतदान योग्य पात्रात टाकून देशाला अधोगतीकडे नेणा-या सत्ताधाऱ्यांना जागा दाखवावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केले.नांदेडमध्ये शनिवारी खा. चव्हाण यांनी तरुणांशी संवाद साधला. आज नांदेडचे तरुण पुणे, मुंबईला जावून नोकरी करीत आहेत. त्यांना नांदेडमध्येच रोजगार मिळावा ही आपली भूमिका आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी एसईझेड आणले. परंतु, भाजपा उमेदवाराने एमआयडीसीच्या भूसंपादनात अडथळे निर्माण करुन स्थानिक तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवले. नांदेडचे उद्योग विस्तारिकरण होऊ न देण्यास भाजपा उमेदवार जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली.ब्रिटिश शासनाने देश लुटला. आता पुन्हा एकदा मोदी आणि शहा देश लुटत आहेत. हा देश धर्मनिरपेक्ष आहे. मात्र धर्मांधता वाढीस लावण्याचे कामही केले जात आहे. भाजपाच्या काळात सरकारच्या विरुद्ध बोलणे म्हणजे देशद्रोह समजला जात आहे. निवडून दिलेले सरकार तुमचे-आमचे म्हणणे ऐकणारे असले पाहिजे, यासाठी युवकांनी मताचे पवित्र दान योग्य पात्रात टाकावे, असे सांगताना ‘वुई विल कम बॅक इन पॉवर’ अशा शब्दात चव्हाण यांनी विश्वास व्यक्त केला. यावर तरुणांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. एकमेकांना शिव्या देणारे सेना-भाजप आज गळ्यात गळे घालून मते मागत आहेत. त्यांना उमेदवारही दुसºया पक्षातून घ्यावा लागत आहे. दुसरीकडे निवडणूक रिंगणात उतरलेली वंचित बहुजन आघाडी भाजपाचीच ‘बी’ टीम असल्याची टीका चव्हाण यांनी केली.युवकांनी रोजगारासह, विकासाच्या अनुषंगाने विचारलेल्या विविध विषयांवरील प्रश्नांना अशोकराव चव्हाण यांनी दिलखुलास उत्तरे दिली.या कार्यक्रमात शिवानी पाटील यांनी इंग्रजी, मराठी व हिंदीमधून राजकीय स्थितीविषयी उपस्थित नवमतदारांना प्रोजेक्टरद्वारे विस्तृत माहिती दिली. शहर व जिल्ह्यातील युवकांच्या मोठ्या संख्येमुळे हा संवाद उपक्रम वैशिष्टयपुर्ण ठरला.मुली म्हणाल्या पप्पांना नांदेडच्या विकासाचा ध्यासप्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचा ‘युवकांशी संवाद’ या कार्यक्रमासाठी त्यांच्या कन्या श्रीजया आणि सुजया यांनी पुढाकार घेतला. युवा पिढीला एकत्रित आणले. यावेळी चव्हाण यांनी तरुणाईपुढे मनमोकळ्या गप्पा मारल्या. श्रीजया चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यासाठी डॉ. शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाण यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. खा. चव्हाण हे जनतेसाठी १८ तास काम करतात. विकासासाठी मतदारांनी त्यांना ताकद देण्याची गरज असल्याचे सांगितले. सुजया चव्हाण यांनी जिल्ह्यासाठी जे काही चांगले करणे शक्य आहे ते केले जात आहे. आजचा युवावर्ग भूलथापांना बळी पडणार नाही असा विश्वास व्यक्त केला. समाजामध्ये चांगले काय आणि वाईट काय? याची युवा पिढीला चांगलीच समज आहे. असे सांगताना ‘हाऊज् द जोश’ याचा प्रत्यय या कार्यक्रमात आल्याचे सुजया यांनी सांगितले.रोजगारनिर्मितीची जबाबदारी माझीया कार्यक्रमात संवाद साधताना तरुणांनो, तुम्हाला मला निराश बघायचे नाही. तुम्हाला मी पकोडा विकण्याचा सल्ला देणार नाही, असे चव्हाण म्हणाले. भारत आता बेरोजगार युवकांचा देश बनला आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी रोजगार निर्मितीची जबाबदारी मी घेईल. तुम्ही निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी, असेही ते म्हणाले.
अधोगतीकडे नेणाऱ्यांना युवकांनी जागा दाखवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:18 AM
देशात युवकांना, युवकांया संघटनांना बोलण्यावर बंदी घातली जात आहे. अनेक युवक नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. मतदान करण्याचा अधिकार संविधानाने दिला असला तरी तो अधिकार हिरावूृन घेण्याचा प्रयत्न शासन करीत आहे.
ठळक मुद्देअशोकराव चव्हाण : नवमतदारांशी साधला संवाद, रोजगाराचा प्रश्न सोडविण्याची स्वीकारली जबाबदारी