शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

हिंगोली जि.प. ‘बांधकाम’ ची कामे रेंगाळलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 1:11 AM

येथील जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या कामांकडेच बहुदा प्रशासनाचे दुर्लक्ष असते. पदाधिकाऱ्यांची दालने वर्षभरातच दुरुस्तीला आली आहेत. विशेष म्हणजे लिफ्टचे कामही थांबलेले आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष, दालनांचीही वर्षभरातच होतेय पडझड

हिंगोली : येथील जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या कामांकडेच बहुदा प्रशासनाचे दुर्लक्ष असते. पदाधिकाऱ्यांची दालने वर्षभरातच दुरुस्तीला आली आहेत. विशेष म्हणजे लिफ्टचे कामही थांबलेले आहे. फर्निचरच्या कामावरुन बोंब होत असून प्रवेशद्वारात टाकलेल्या फरशीवर पाणी साचत आहे.हिंगोली जि.प.च्या बांधकाम विभागाची अनागोंदी कायम समोर येत असते. जि.प.तील अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या दालनाची कामे तर दरवर्षीच करावी लागतात. यावरून बाहेरच्या कामांच्या दर्जाची तुलना करता येईल. या विभागातील अधिकाºयांचे कामाकडे लक्ष असते की नाही, याची शंका घ्यावी इतपत प्रकार समोर येतात. मध्यंतरी तर कामाच्या दर्जावरून अनेक तक्रारी येत होत्या. वसमतच्या उपअभियंत्याची तर वेगळीच तक्रार सीईओंपर्यंत जाऊनही काहीच झाले नाही. परिणामी, बांधकाम विभागाचे मनोबल वाढत आहे. गेल्यावर्षीच पदाधिकाºयांच्या दालनाची कामे झाली असताना पार्टीशन उखळले असून पीओपी गळू लागली आहे. लिफ्टचे काम अनेक महिन्यांपासून सुरूच आहे. ग्रीननेट टाकून ते झाकले असले तरीही जास्त दिवस हे काम असेच राहिले तर अपघाताचा धोकाही नाकारता येत नाही. प्रवेशद्वारावर फरशी तर टाकली. मात्र आता तेथेच पावसाचे पाणी साचत आहे. स्वच्छतागृहांचे बेहाल कायम आहेत. काही स्वच्छतागृहे बंदच आहेत. कुठे पाणी आहे तर गळतीची समस्या आहे तर कुठे पाणीच नाही. एकेका विभागात आता कर्मचाºयांसाठी फर्निचरची व्यवस्था केली जात आहे. मात्र त्यात सोयी कमी अन् गैरसोयीच जास्त असल्याची कर्मचाºयांचीच बोंब आहे. अभियंता मंडळी गुत्तेदारासाठी डिझाईन बनविते की, कर्मचाºयांच्या सोयीसाठी, असा सवाल केला जात आहे.

टॅग्स :NandedनांदेडHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद