लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : कृषी उत्पन्न बाजार समितीत 14 मार्चपासून गव्हाची आवक सुरू झाली होती़ पहिल्या दिवसापासून तेजीत असलेली आवक केवळ 10 दिवसात 10 हजार क्विंटलर्पयत पोहोचली आह़े दर दिवशी येणा:या या गव्हाला 1 हजार 900 रूपयांपासून प्रतिक्विंटल दर देण्यात येत आहेत़ जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात 21 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर गहू पेरणी करण्यात आली होती़ नोव्हेंबर अखेरीपासून पेरणी होत असलेल्या गव्हाची कापणी मार्चच्या पहिल्या आठवठय़ापासून सुरू झाली होती़ कापणी केल्यानंतर तात्काळ बाजारात आणण्यापेक्षा शेतक:यांनी दरांची चाचपणी करून घेतली होती़ 1 हजार 500 रूपयांच्या पुढे गहू दर असल्याने शेतक:यांनी उत्पादन गेल्या 14 मार्चपासून बाजारात आणले होत़े पहिल्याच दिवशी विक्रमी 1 हजार क्विंटल आवक झालेल्या गव्हाची आवक गेल्या 10 दिवसांपासून वाढत असल्याने व्यापारी, आडते, हमाल, मापाडी यांची लगबग वाढून बाजारात लाखो रूपयांची उलाढाल झाली आह़े नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाच्या आगमनाने निर्माण झालेली मंदी दूर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आह़े गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा शेतक:यांनी पेरणी केलेल्या गहूचे हेक्टरी उत्पादन 1 हजार किलो किंवा त्यापेक्षा अधिक असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तवण्यात आला आह़े येत्या महिन्यात संपूर्ण उत्पादन निघाल्यानंतर उत्पादकतेचे स्पष्ट हेक्टरी आकडे सूमजून येणार आहेत़ सध्या बाजार समितीत 2189 या गव्हाचे दर 1900 ते 2250, लोकवन -1551 ते 1875, तर गहू -973 या गहू वाणाला 3802 ते 4225 रूपये प्रतिक्विंटल दर देण्यात येत आह़े बाजारात आतार्पयत आलेल्या 10 हजार क्विंटल गव्हाची खरेदी व्यापा:यांकडून याच दराने करण्यात आल्याने गेल्या हंगामात झालेले नुकसान भरून निघाल्याची प्रतिक्रिया शेतक:यांकडून देण्यात येत आह़े बाजारात गव्हाच्या आवक वाढीने आर्थिक उलाढाल गतीमान झाल्याने व्यापारीही सुखावले आहेत़ येत्या 1 एप्रिलनंतर पुन्हा गव्हाची आवक सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े शनिवारी सायंकाळर्पयत नंदुरबार, तळोदा व नवापूर तालुक्यासह गुजरात राज्याच्या विविध भागातून शेतकरी गहू नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत आणत होत़े विविध भागातील शेतकरी गहू घेऊन सकाळीच हजर झाले होत़े यात दुर्मिळ अशा 973 गहू वाणाचीही खरेदी व्यापा:यांकडून करण्यात आली़ चांगल्या प्रतीचा गहू असल्याने त्याला प्रतिक्विंटल 4 हजार 225 रूपये दर देण्यात येत आह़े गेल्या 10 दिवसांत बाजारात दर दिवशी तुरळक स्वरूपात गव्हाची आवक सुरू आह़े 973 गव्हाची खरेदी करण्यासाठी बाहेरगावाहून खरेदीदार आणि व्यापारी बाजार समितीत वेळोवेळी भेट देत आहेत़
नंदुरबारात 10 दिवसात 10 हजार क्विंटल गहू आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:10 PM