लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून आढळून येणा-या कोरोना बाधित रुग्णांसाठी १०८ रूग्णवाहिका महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. बाधिताच्या घरापासून थेट कोविड सेंटरपर्यंत आणून सोडत त्यांचे जीव वाचवणा-या या रुग्णावाहिकांना चालवणारे चालक, वाहक, डाॅक्टर्स यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे. जिल्ह्यात ठेका पद्धतीने १०८ च्या रुग्णवाहिका सुरू आहेत. यासाठी ३६ चालक व डाॅक्टर्स नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून गंभीर कोरोनाबाधित रुग्ण किंवा अपघाती रुग्णाला तातडीने दाखल करण्यासाठी वाहतूक केली होती. दर दिवशी जिल्ह्यासह परजिल्ह्यात रुग्ण वाहून नेणा-या या रुग्णवाहिका सुमारे दीड हजार किलोमीटरचे अंतर पार करत आहेत. जिल्ह्यात काम करणा-या रुग्णवाहिकेवरील कर्मचा-यांच्या काही मागण्या असून यात प्रामुख्याने धडगाव, नवापूर, मोलगी, धडगाव याठिकाणी निवास करण्यासाठी क्वार्टर्स नसल्याने अडचणी वाढत आहेत. या सुविधा दिल्यास अनेक अडचणी दूर होणार आहेत.
डॉक्टर, कर्मचाऱ्यांना निवास व्यवस्था हवी*खाजगी कंपनीकडून चालवण्यात येणा-या चालक वाहकांना नियमित वेतन देण्यात येत असल्याची माहिती देण्यात येत आहे. काही ठिकाणी निवासस्थाने देण्याची मागणी आहे. *नियुक्त करण्यात येणारे डाॅक्टर्सही रुग्णवाहिकांवर काम करत असल्याने त्यांना शासकीय निवासस्थानात जागा देण्याची मागणी आहे.
१०८ रुग्ण वाहिका १४
चालक वाहकांची संख्या ३६
कोरोना काळात सहा हजार रुग्णांची केली वाहतूक एप्रिल ते नोव्हेंबर या काळात पहिला रुग्ण आढळल्यापासून १०८ रुग्णवाहिकांचा वापर सुरू आहे. बाधित रुग्णांसोबतच गंभीर रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करुन देत ही वाहतूक केली गेली हे विशेष. गंभीर रुग्णांसाठी याठिकाणी डाॅक्टर्स उपलब्ध करुन देण्यात आले होते. जिल्ह्याबाहेर जाणा-यांनाही हे वाहन दिले गेले.
अपघातातील रुग्णांचे वाचविले प्राणनवापूर ते कोंडाईबारी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग, शेवाळी नेत्रंग महामार्गसह दुर्गम भागात होणा-या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने जिल्हा मुख्यालयापर्यंत आणण्याचे काम १०८ रुग्णवाहिकांनी केले आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या काळात २ हजार पेक्षा अधिक अपघातग्रस्तांना मदत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोना रुग्णांची वाहतूक करण्यासाठी १०८ रुग्णवाहिका तैनात आहेत. चालक व वाहक सातत्याने कामावर आहेत. बाधित रुग्णाला पूर्ण दक्षता घेत रुग्णालयापर्यंत आणून सोडत पुन्हा दुस-या रुग्णांना घेण्यासाठी १०८ रुग्णवाहिका धावत राहिल्या आहेत. -निलेश पाटील, व्यवस्थापक, बीव्हीजी.