मनोज शेलार/नंदुरबारनंदुरबार : नंदुरबार तहसील कार्यालयाच्या माध्यमातून नंदुरबार तालुक्यातील विशेष साहाय्य योजनेच्या निराधार लाभार्थ्यांना एक कोटी १२ लाख ७१ हजार रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आलेे आहे. तसेच वंचित ११ हजार ११२ लाभार्थ्यांनादेखील मार्चअखेर अनुदान वितरित करण्यात आले, अशी माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली.
राज्य शासनाच्यावतीने वंचित घटकांसाठी विशेष साहाय्य योजनेंतर्गत अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. नंदुरबार तालुक्यातील ११ हजार ११२ लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला विशेष साहाय्य योजनेच्या माध्यमातून एक कोटी १२ लाख ७१ हजार रुपयांची मदत दिली जाते. केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यावर तत्परतेने लाभार्थ्यांना मानधन वितरित करण्यात येते. त्यात संजय गांधी निराधार योजनेतील दोन हजार ५४७ लाभार्थ्यांना २५ लाख ८२ हजार ४०० रुपये अनुदान, श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेतील तीन हजार २८६ लाभार्थ्यांना ३८ लाख ३६ हजार रुपये अनुदान, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेतील चार हजार १४० लाभार्थ्यांना ३३ लाख नऊ हजार रुपये अनुदान, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेतील एक हजार ३३ लाभार्थ्यांना सात लाख ३६ हजार २०० रूपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजनेतील ६८ लाभार्थ्यांना ४७ हजार ६०० रूपये व कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून ३८ लाभार्थ्यांना ४७ हजार ६०० रूपये व कुटुंब अर्थसहाय्य याेजनेतून ३८ लाभार्थ्यांना सात लाख ६० हजार रूपये असे एकूण ११ हजार ११२ लाभार्थी मिळून एक कोटी १२ लाख ७१ हजार २०० रुपयांचे अनुदान प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एनएफटीद्वारे वितरित करण्यात आले.
तसेच कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात एकरकमी २० हजार रुपयेदेखील डीएससीद्वारे जमा करण्याची कार्यवाही झाली आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार नितीन पाटील, प्रीती पाटील, मंगला वसावे, चेतन सोनार आदींनी परिश्रम घेतले.