चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील टीम मिशनच्यावतीने 1905 साली चर्चची स्थापना करण्यात आली होती़ याठिकाणी गेल्या 113 वर्षापासून ािस्ती बांधव नाताळ साजरा करत आहेत़ गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या नवापूर तालुक्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून ािस्ती बांधवांचा रहिवास आह़े धुळे ते सुरत या मार्गावर महत्त्वाचे स्थानक असल्याने तत्कालीन ब्रिटीश अधिकारी यांचा चिंचपाडा येथे वावर होता़ यातून 1905 सालापासून याठिकाणी चर्चची स्थापना करण्यात आली़ स्थानिक ािस्ती बांधवांच्या सहकार्याने याठिकाणी वर्षभर विविध कार्यक्रम होतात़ यात रविवारच्या प्रार्थनेसह महिला मंडळ, तरुण संघ, लहान मुलांचे क्वायर ग्रुप यांचा सहभाग अधिक असतो़ तालुक्यातील 30 गावांमध्ये राहणारे ािस्ती बांधव याठिकाणी नाताळच्या उत्सवासाठी एकत्र येतात़ त्यांच्याकडून 22 डिसेंबरपासूनच विविध कार्यक्रमांना सुरुवात करण्यात येत़े 24 आणि 25 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत सर्वधर्मिय आणि ािस्ती बाधवांच्या प्रार्थना होतात़ नाताळनिमित्त जिल्ह्यातील अधिकारी व राजकीय पक्षांचे नेते याठिकाणी भेट देत ािस्ती बांधवांना शुभेच्छा देत आहेत़ नाशिक विभागाचे चर्च मंडळाध्यक्ष व्ही़एच़वळवी, सचिव सुधाकर वळवी यांच्यासह मिशनचे पदाधिकारी याठिकाणी विविध कार्यक्रमांचे नियोजन करत आहेत़ याठिकाणी ािस्ती बांधवांतर्फे सेवाभावी हॉस्पिटल 113 वर्षापासून सुरु आह़े या रुग्णालयात मोफत सेवा देऊन उपचार केले जातात़ पसिरातील गावांमधील नागरिकांसह खांडबारा परिसरातील रुग्ण उपचारासाठी येथे येतात़
नवापूर तालुक्यातील चिंचपाडय़ाच्या टीम मिशन चर्चला 113 वर्षाचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:15 AM