लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 12 लाख प्राधान्य योजनेतील कुटूंबांना धान्य वितरण आणि गॅस जोडणी दिली जाणार आहे. नागरिकांनी गॅस जोडणीसाठी विस्तारीत उज्वला योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.योजनेअंतर्गत पात्र कार्डधारकांना केवळ 100 रुपये भरुन गॅस जोडणी मिळणार असून उर्वरित खर्च शासन करणार आहे. अंत्योदय योजनेचा इष्टांक एक लाख सहा हजार 698 कार्ड व प्राधान्य योजनेसाठी सात लाख 36 हजार 69 युनिट असे एकूण 12 लाख 65 हजार 760 पात्र व्यक्तींना अन्नधान्य लाभ देण्यात येत आहे. इष्टांक पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागात वार्षिक उत्पन्न 44 हजार व शहरी भागात 59 हजार उत्पन्न असलेल्या व सध्या धान्य मिळत नसलेल्या एनपीएच योजनेतील केशरी कार्ड धारकांकडून हमीपत्र भरुन घेण्याचे तसेच प्राधान्य योजनेत आलेले हमीपत्र तपासुन पात्र कार्ड धारकांना समाविष्ट करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातील ज्या कुटुंबांकडे अंत्योदय व प्राधान्य योजनेची शिधापत्रिका आहे परंतु गॅस कनेक्शन नाही अशा उज्वला योजनेसाठी पात्र असणा:या कार्डधारकांकडून विस्तारीत उज्वला योजनेचे अर्ज स्वस्त धान्य दुकानदार यांचेमार्फत भरुन घेण्यात येत आहेत. तपासणीनंतर पात्र असणा:या कार्ड धारकांना गॅस एजन्सीमार्फत गॅस कनेक्शन वाटप करण्यात येत आहे. जे कार्डधारक रॉकेलचे हमीपत्र भरुन दिलेले असल्याने रॉकेल घेत आहेत त्या कार्डधारकांनी प्राधान्याने विस्तारीत उज्वला योजनेचे फॉर्म भरुन घ्यावेत. त्या कार्डधारकांना सप्टेंबर 2019 पासून रॉकेलचे वितरण केले जाणार नाही याची सर्व कार्डधारकांनी नोंद घ्यावी. या योजनेचा जास्तीत जास्त कार्डधारकांनी लाभ घेऊन गॅस कनेक्शन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिका:यांनी केले आहे.
12 लाख शिधापत्रिकांना प्राधान्य कुटूंब योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 12:30 PM