शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

यात्रा सुरू होण्यापूर्वीच सारंगखेड्यात १२०० घोडे विक्रीसाठी दाखल

By मनोज शेलार | Published: December 21, 2023 5:48 PM

सारंगखेडा येथील दत्त प्रभूंच्या यात्रेला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधीच येथील घोडे बाजाराला सुरुवात झाली आहे.

नंदुरबार : सारंगखेडा, ता. शहादा येथील यात्रेतील प्रसिद्ध घोडे बाजारात देशभरातून घोड्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. सद्य:स्थितीत १२०० घोडे येथे विक्रीसाठी आले आहेत. यात्रा सुरू होईपर्यंत तब्बल तीन हजार घोडे दाखल होण्याची शक्यता आहे. सारंगखेडा येथील दत्त प्रभूंच्या यात्रेला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधीच येथील घोडे बाजाराला सुरुवात झाली आहे.

येथील घोडे बाजार देशभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे देशभरातील विविध प्रांतातून उमदे घोडे येथे विक्रीसाठी येत असतात. अश्वशौकिनांचीही येथे मांदीयाळी असते. मारवाड, काठेवाडी, पंजाब जातीचे उमदे घोडे विक्रीसाठी येत असतात. चित्रपट सृष्टीतील कलाकारांसह राज्य व केंद्रीय नेतेही अश्व बाजारात भेट देऊन घोडे खरेदी करतात.

गुरुवार अखेर येथील अश्व बाजारात जवळपास १२०० उमदे घोडे दाखल झाले आहेत. यात्रा सुरू होईपर्यंत ही आकडेवारी जवळपास तीन हजारांपेक्षा अधिक जाईल अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी दिली. यात्रा काळात सारंगखेडा येथे तात्पुरते कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय उभारले आहे.