नंदुरबार : रोजगार हमी योजनेतून रोपवाटिका व डोंगर उतारावर वृक्षारोपणासाठी चर खोदण्याच्या कामांमध्ये 14 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी वनविभागाने नंदुरबार तालुक्याचे तत्कालीन वनक्षेत्रपाल अशोक मदन प्रकाशकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आह़े याबाबत सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े त्यात म्हटले आहे की, तालुक्यातील 11 गावात रोपवाटिका तयार करण्यासाठी निधीला मंजुरी देत काम न करता 14 लाख 75 हजार 496 रुपयांच्या रकमेचा अपहार करत शासनाची फसवणूक केली आह़े नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी पहाटे तीन वाजता हा गुन्हा दाखल झाला आहे.
14 लाखांचा गफला!
By admin | Published: February 22, 2017 12:27 AM