नंदुरबार : जिल्ह्यातील 14 हजार आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत़ 2017-18 हे शैक्षणिक वर्ष पूर्ण होऊनही विद्याथ्र्याच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा झालेली नसल्याने विद्याथ्र्याच्या अडचणी वाढल्या आहेत़ शिष्यवृत्ती मिळावी यासाठी विद्याथ्र्यानी प्रकल्प कार्यालयात आंदोलन करूनही प्रश्न सुटलेला नाही़ आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार आणि तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या 111 विविध वरिष्ठ, कनिष्ठ, अध्यापक, फार्मसी, इंजिनियअरींग, डिप्लोमा यासह व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवणा:या महाविद्यालयात गेल्या वर्षात 14 हजार विद्याथ्र्यानी प्रवेश घेतला होता़ विद्याथ्र्याच्या प्रवेशानंतर त्यांनी एप्रिल 2018 र्पयतच्या अंतिम मुदतीत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरून दिले होत़े शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर या विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती मिळण्याची अपेक्षा होती़ परंतू पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊनही त्यांना शिष्यवृत्तीची प्रतिक्षा आह़ेनंदुरबार प्रकल्पांतर्गत 84 महाविद्यालयातून गेल्या शैक्षणिक वर्षात आठ हजार 449 विद्याथ्र्यानी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज केला होता़ यातील 7 हजार 169 विद्याथ्र्याचे अर्ज मंजूर करण्यात आले होत़े या विद्याथ्र्याच्या शिष्यवृत्तीपोटी नंदुरबार प्रकल्प कार्यालयाने आदिवासी विकास विभागाकडे पाहिल्या टप्प्यात 5 कोटी 57 लाख 280 तर दुस:या टप्प्यात 99 लाख 76 हजार रूपयांचे देयक सादर केले होत़े एकूण 6 कोटी 57 लाख रूपयांची ही रक्कम 84 महाविद्यालयांमध्ये प्रकल्प कार्यालयाने मंजूरी दिलेल्या अभ्यासक्रमाच्या 721 विषयांसाठी मंजूर करण्यात आली होती़ यात विद्याथ्र्याचे प्रवेशशुल्क आणि वार्षिक शिष्यवृत्तीही समाविष्ट होती़ आदिवासी विकास विभागाकडे सादर केलेल्या या देयकाची रक्कम अद्याप प्राप्त झालेली नसल्याची माहिती आह़े महाविद्यालयांना शिष्यवृत्ती मिळालेली नसल्याने विद्याथ्र्याच्या प्रवेश प्रक्रियेसह शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दुस:या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासह अडचणी येत असल्याने समस्या वाढल्या आहेत़तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत तळोदा, धडगाव आणि अक्कलकुवा या तीन तालुक्यातील 34 विविध महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षात प्रवेशित झालेल्या 6 हजार 18 विद्याथ्र्यानी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरून दिले होत़े या विद्याथ्र्याना 2 कोटी 34 लाख 92 हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता़ याबाबतचे देयक तळोदा प्रकल्पने आदिवासी विकास विभागाकडे पाठवून दिले होत़े 34 महाविद्यालयांमधील 242 विषयांना प्रकल्प कार्यालयाने मंजूरी दिल्यानंतर या शिष्यवृत्तीच्या रकमेला मंजूरी देण्यात आल्याची माहिती आह़े तळोदा प्रकल्प कार्यालयाने दुस:या टप्प्यात 43 लाख रूपयांचे सुधारित देयक विभागाला पाठवले होत़े शिष्यवृत्ती मिळत नसल्याने विद्यार्थी सातत्याने प्रकल्प कार्यालयास भेटी देत आहेत़ तळोदा प्रकल्पांतर्गत महाविद्यालयांमध्ये प्रवेशित झालेले बहुतांश विद्यार्थी हे सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील गावांसह तळोदा तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत़ महाविद्यालयांमध्ये शिष्यवृत्ती जमा करण्यात आलेली नसल्याने त्यांना नवीन शैैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यास अडचणी आल्या होत्या़
नंदुरबारातील 14 हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:40 AM