लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 15 दिवसात पोलिसांची प्रतिमा सुधारण्यात यावी व सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना आखाव्या अशा सुचना गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी नंदुरबारात आयोजित खान्देशस्तरीय कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत बोलतांना दिल्या.नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीची वेळ सायंकाळी सहा वाजेची होती. परंतु मंत्र्यांना येण्यास उशीर झाल्याने रात्री उशीरा अर्थात साडेअकरा वाजता बैठक सुरू झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, नंदुरबारचे पोलीस अधीक्षक संजय पाटील, जळगावचे दत्तात्रय कराळे, धुळ्याचे एम.रामकुमार, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरिष चौधरी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी केसरकर यांनी तिन्ही जिल्ह्यांचा कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातील आढावा घेतला. राईनपाडय़ातील घटनेच्या पाश्र्वभुमीवर त्यांनी दक्षता घेण्याच्या सुचना केल्या. तिन्ही पोलिीस अधीक्षकांनी आपल्या जिल्ह्याचे प्रेङोंटेशन केले. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबारातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत गंभीर आरोप केले. शहरात अवैध धंदेवाल्यांची चलती आहे. पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे पोलिसांची मान खाली जात आहे. पोलिसांची प्रतिमा सुधारावी, अवैध धंदे बंद व्हावे अशी मागणी आमदार रघुवंशी यांनी केली. त्यावर मंत्री दिपक केसरकर यांनी येत्या 15 दिवसात हे चित्र बदललेले दिसले पाहिजे. पोलिसांची प्रतिमा सुधारली पाहिजे अशा सुचना त्यांनी पोलीस अधीक्षक संजय पाटील यांना दिल्या. बैठक बराच वेळ बंदद्वार झाली. पोलीस अधिकारी, दोन्ही लोकप्रतिनिधी यांच्याशिवाय कुणालाही बैठकीत येण्यास मनाई करण्यात आली होती.
पोलिसांची प्रतिमा 15 दिवसात सुधारण्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या नंदुरबारात सुचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 11:49 AM