लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के बदल्यांच्या प्रक्रियेस बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सात विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांच्या १५ टक्के बदल्या ३१ जुलै अखेर करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेत समुपदेशन शिबिर घेऊन बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुपेंद्र बेडसे, संबधीत विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.या प्र्रक्रियेअंतर्गत सकाळी १० वाजेपासून त्या त्या विभागातील बदलीपात्र कर्मचाºयांना बोलावून त्यांना ज्येष्ठेतेनुसार बदलीसाठीचा विकल्प देण्यात आला. त्यासाठी सभागृहात स्क्रिन लावण्यात आली होती.पहिल्या दिवशी सकाळी अर्थ विभाग, दुपारी बांधकाम विभाग, लघुसिंचन विभाग, ग्रामिण पाणी पुरवठा, यांत्रिकी विभाग तर सायंकाळी महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभागाअंतर्गत विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्या बदल्या करण्यात आल्या. सायंकाळी उशीरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. पहिल्या दिवशी साधारणत: ४५ पेक्षा अधीक जणांच्या बदल्या करण्यात आल्याचे समजते.गुरुवार, २३ रोजी सकाळी सामान्य प्रशासन विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग तर दुपारी ग्रामपंचायत विभागाच्या बदल्या होणार आहेत. शुक्रवार २४ रोजी सकाळी आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सेवक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, औषध निर्माण अधिकारी यांचा समावेश राहणार आहे तर दुपारी आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, पर्यवेक्षक यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत.गर्दी होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेत १५ टक्के बदली प्रक्रियेस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:41 PM