लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : डेंग्यूवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रशासनाने शहरात 16 आरोग्य पथके पाठवली असून त्यांच्याकडून सव्रेक्षण करुन रक्तनमुने संकलन केले जात आह़े दरम्यान शहरात सात मशीनद्वारे धूर फवारणी करण्यात आली आह़े डेंग्यूमुळे दोन आठवडय़ापासून शहरात हाहाकार उडाला होता़ सर्वच दवाखान्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने भिती वाढली होती़ डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा जोरदारपणे कामाला लागली होती़ साथ वाढण्याची भिती असल्याने आरोग्य पथकांनी घरोघरी जावून पाणी परीक्षण करत नागरिकांना कोरडा दिवस पाळण्यासह विविध उपाययोजनांची माहिती दिली होती़ यातून शहरात तूर्तास डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून आलेले नसल्याची माहिती देण्यात आली आह़े डेंग्यू नियंत्रणात रहावा यासाठी शहरात आरोग्य विभागाची 16 पथके कार्यरत आहेत़ दरम्यान सोमवारपासून एलायझा किट संपल्याने संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासणी थांबली होती़ गुरुवारी जिल्हा रुग्णालयात कीट प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारपासून तपासण्या सुरु करण्यात आल्या़ नवीन कीटद्वारे 200 जणांच्या तपासण्या पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े आरोग्य विभागाला लवकरच वाढीव कीट पाठवण्यात येणार आह़े
शहरात डेंग्यूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पालिकेने केलेल्या चार भागांमध्ये पथकांकडून कारवाई करण्यात येत आह़े शुक्रवारी सकाळपासून म्हाडा कॉलनी, हुडको कॉलनी यासह विविध ठिकाणी सव्रेक्षण करण्यात आले होत़े या सव्रेक्षणादरम्यान नागरिकांनी घरातील पाण्याचे साठे व भरलेल्या टाक्या खाली करुन दिल्या होत्या़ शहरात आरोग्य विभागाने पाच तर पालिकेने 1 लहान आणि 1 जंबो फॉगिंग मशीनद्वारे फवारणी सुरु केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आह़े आरोग्य विभागाकडे अद्यापही 90 जणांचे रक्तनमुने तपासणीसाठी देण्यात आले आहेत़