नंदुरबार : जिल्ह्यात मंजूर असलेल्या नायब तहसीलदारांच्या पदसंख्येत चालू वर्षात वाढ होणार असून नाशिक विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यात अव्वल कारकून म्हणून काम करणा:या 16 जणांना नायब तहसीलदार पदावर पदोन्नत केले आह़े महसूल विभागाच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्षे पदोन्नती प्रक्रिया प्रलंबित असलेल्या अव्वल कारकूनांच्या समस्या निकाली निघाल्या आहेत़ नंदुरबार जिल्हा प्रशासनात सामान्य शाखा, अभिलेख शाखा, निवडणूक विभाग, सरदार सरोवर प्रकल्प विभाग, नंदुरबार, शहादा आणित तळोदा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय, महसूल शाखा तसेच प्रत्येक तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आह़े एकूण 38 ठिकाणी नायब तहसीलदार पदाची निर्मिती करण्यात आली आह़े यातील सात पदे सध्या रिक्त आहेत़ या उपविभागीय, महसूल आणि तालुका पातळीवर विविध कामकाजात प्रांताधिकारी आणि अधिका:यांना सहाय्य करणा:या या नायब तहसीलदारांच्या पदोन्नतीचा प्रश्न गेल्या सात ते आठ वर्षापासून प्रलंबित होता़ महसूल विभागीय परीक्षा पास होऊनही अनेकांना संधी मिळालेली नव्हती़ यातून नाशिक येथील विभागीय आयुक्तांकडे जिल्हाधिकारी कार्यालयाने 16 अव्वल कारकूनांच्या पदोन्नतीची शिफारस केली होती़ यावर विभागीय आयुक्तांनी आदेश काढून 16 जणांना पदोन्नत करण्याचा निर्णय घेतला आह़े यातील 15 नंदुरबार जिल्ह्यात तर एक अव्वल कारकून धुळे जिल्ह्यात नायब तहसीलदार पदावर कार्यरत होणार आहेत़ आगामी निवडणूक काळासाठी या अधिका:यांचा उपयोग होणार असल्याने जिल्हा प्रशासनातून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े एकीकडे 16 जणांना पदोन्नत करण्याचा शासनाने निर्णय घेतला असताना दुसरीकडे नायब तहसीलदार पदावर कार्यरत एका अधिका:यास पदवनत करण्यात आले आह़े त्यांची पुन्हा अव्वल कारकून म्हणून नियुक्ती झाली आह़े विभागीय परीक्षेत उत्तीर्ण होऊन सेवाज्येष्ठतेला धरुन पदोन्नती झालेली नसल्याने विभागीय आयुक्तांनी हा निर्णय दिल्याची माहिती महसूल सूत्रांनी दिला आह़े
16 अव्वल कारकूनांना नायब तहसीलदार पदावर पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 5:38 PM