लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील दुष्काळी दौ:यात विविध गावांमधील 168 हातपंप नादुरूस्त असून, त्यांची अद्यापर्पयत दुरूस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथील गावक:यांना कृत्रीम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती नसली तरी संबंधीत प्रशासनाच्या बेजबाबदारीमुळे नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप आमदार उदेसिंग पाडवी यांनी केला आहे.यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर आमदार उदेसिंग पाडवी यांनी 10 ते 12 दिवस आपल्या कार्यकत्र्यासमवेत तळोदा तालुक्यातील ग्रामीण खेडय़ांना भेटी दिल्यात. त्या वेळी त्यांनी गावातील पाणीटंचाई व शासनाच्या इतर योजनांबाबतीत गावक:यांकडून प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. तेव्हा त्यांना शासनाच्या योजना व पाणीटंचाईचे विदारक चित्र दिसून आले होते. अनेक गावामधील जवळपास 168 हातपंप नादुरूस्त झालेले आहेत. अद्यापर्पयत गावात संबंधीत यंत्रणेकडून दुरूस्तीच करण्यात आली नाही. याशिवाय काही ठिकाणी पाण्याची पातळी खालावल्यामुळे बंद पडली आहेत. केवळ यंत्रणांच्या अकार्यक्षम आणि बेजबाबदारीमुळे तेथील नागरिकांना नैसर्गिक पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गावक:यांनी दुरूस्तीबाबत संबंधीतांकडे मागणी करूनही त्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली आली आहे. वास्तविक दुष्काळाच्या पाश्र्वभूमिवर संभाव्य पाणी टंचाईबाबत उपाययोजनांसाठी सजग राहण्याच्या सूचना प्रशासनाच्या आढावा बैठकीत देण्यात आल्या होत्या. यावर कार्यवाही तर सोडा आपल्या संपूर्ण दौ:यात एकही तलाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी स्थानिक ठिकाणी आढळून आले नाहीत. अनेक ग्रामसेवकांच्या बाबतीत नागरिकांनी मोठय़ा तक्रारी केल्या आहेत. प्रशासनाच्या प्रभावी अंमलबजावणीअभावी अनेक गावांमधील रहिवाशांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळालेला नसल्याची तक्रारदेखील नागरिकांनी केली आहे. त्यांच्या सोबत नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, डॉ.रामराव आघाडे, नितीन पाडवी, नगरसेवक हेमलाल मगरे, भास्कर मराठे, पंचायत समिती सदस्य यशवंत ठाकरे, कांतीलाल पाडवी, गोपी पावरा, शामसिंग वळवी, अमरसिंग नाईक, कृष्णा वळवी, माधव पाडवी, भिमसिंग ठाकरे, स्वरूपसिंग ठाकरे, जयवंत ठाकरे, प्रताप पाडवी, मानसिंग डुमकूळ, महेंद्र पवार, महेंद्र गाडे, सुरेंद्र पाडवी, रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते.
168 हातपंप नादुरूस्त असल्याने टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 12:10 PM