नंदुरबार : जिल्ह्यातील 53 ग्रामपंचायतींसाठी 170 मतदान केंद्रांची निर्मिती प्रशासनाने केली आह़े जिल्ह्यात 66 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 53 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आह़े यासाठी महसूल विभागाकडून तयारी पूर्ण झाली असून मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून निवडणूक अधिकारी व कर्मचारी ग्रामपंचायतींकडे रवाना होणार आहेत़ शहादा तालुक्यातील 22, नवापूर 5, तळोदा 4, अक्कलकुवा 2 तर नंदुरबार तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींसाठी होणा:या या मतदानात लोकनियुक्त सरपंच पदासाठी 174 तर सदस्य पदासाठी 756 उमेदवार रिंगणात आहेत़ शहादा आणि नंदुरबार तालुक्यात निवडणूक सर्वाधिक लक्ष्यवेधी असून दोन्ही तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेला प्रचार सोमवारी सायंकाळी पाच वाजेनंतर थंडावला़ प्रचारात स्थानिक मुद्दे चर्चिले गेल्याने निवडणूक रंगतदार ठरणार आह़े नंदुरबार तालुक्यात 23 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला होता़ यात सुजालपूर, नाशिंदे व भागसरी ही गावे बिनविरोध झाली होती़ उर्वरित 20 ग्रामपंचायतीतील 54 प्रभागात 54 उमेदवार बिनविरोध निवडले गेल्याने तालुक्यात आता 19 सरपंच पदाच्या जागांसाठी 59 तर सदस्य पदाच्या 178 जागांसाठी 307 उमेदवार रिंगणात आहेत़ 20 ग्रामपंचायतीच्या निवडणूका सुरळीत पार पाडण्यासाठी नंदुरबार तहसील कार्यालयाकडून 60 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आह़े यासाठी 414 कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात आली आह़े या कर्मचा:यांकडून 80 मतदान यंत्रे देण्यात आली असून बुधवारी सकाळी तहसील कार्यालयात प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत़ सोमवारी तहसील कार्यालयाच्या आवारात मतदान यंत्रे सील करण्यात आली होती़ शहादा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी 72 तर सदस्य पदासाठी 258 उमेदवार रिंगणात आहेत़ तालुक्यातील 10 ग्रामपंचायती या पूर्वी बिनविरोध झाल्या आहेत़ तर सदस्य पदाच्या 266 जागांपैकी 131 जागा ह्या बिनविरोध झाल्या होत्या़ यातही 22 ठिकाणी उमेदवारांचे अजर्च न आल्याने त्या ठिकाणी निवडणूक रद्द करण्यात आल्या आता 23 सरपंच आणि 123 सदस्य पदासाठी मतदान होणार आह़े बुधवारी होणा:या मतदानाच्या पाश्र्वभूमीवर शहादा तहसील कार्यालयाने 71 मतदान केंद्रांची निर्मिती केली आह़े यात 100 बूथ ऑफिसर तर 400 मतदान कर्मचारी यांची नियुक्ती आह़े तसेच 100 कर्मचारी हे राखीव म्हणून तैनात राहणार आहेत़ या कर्मचा:यांचे प्रशिक्षण तहसीलदार मनोज खैरनार, नायब तहसीलदार डॉ़उल्हास देवरे यांनी घेतले होत़ेतालुक्यातील आडगाव, करजई, पिंप्री, लांबोळा, वाघोदा, उजळोद, तितरी, सावळदे, वाघर्डे आणि नवानगर ह्या ग्रामपंचायती यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत़
नंदुरबारातील 53 ग्रामपंचायतींसाठी 170 मतदान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:04 PM