लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील चार मतदार संघात सोमवारी सकाळी सात ते 11 या दरम्यान 18़77 टक्के मतदान झाल़े चारही मतदार संघातील 1 हजार 385 मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र सकाळपासून दिसून आल़े अक्कलकुवा विधानसभा मतदार संघासाठी सकाळी 11 र्पयत 24़2, शहादा 22़75, नवापुर 21़9 तर सर्वाधिक कमी 7़88 टक्के मतदान नंदुरबार विधानसभा मतदारसंघासाठी झाल़े सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात मतदानाचा सर्वाधिक उत्साह असून मतदार उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रांकडे जात असल्याचे चित्र होत़े निवडणुकीत नवापूर मतदारसंघातून 10 उमेदवार नशीब आजमावत आहेत. अक्कलकुवा व नंदुरबार मतदारसंघात प्रत्येकी सहा तर शहादा मतदारसंघात केवळ चार उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 6 दरम्यान मतदान होणार आह़े रविवारी त्या त्या विधानसभा मतदारसंघ मुख्यालयातून निवडणूक कर्मचा:यांना मतदान साहित्य देवून रवाना करण्यात आले होत़े मतदानासाठी 1 हजार 771 ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट उपलब्ध करुन देण्यात आले असून सर्वच ठिकाणी सुरळीतपणे मतदान प्रक्रिया सुरु झाली होती़ विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने शहादा, नंदुरबार व नवापूर, काँग्रेसने चारही मतदार संघात, शिवसेनेने अक्कलकुवा, वंचीतने दोन ठिकाणी, बसपा एक तर आप ने एका ठिकाणी उमेदवार दिले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यात 1 हजार 100 स्थानिक पोलीस, 855 होमगार्डस्, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या चार तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय चार संवेदनशील मतदान केंद्र आणि 42 इतर मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त राहणार आहे.दरम्यान नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार डॉ़ विजयकुमार गावीत व त्यांच्या पत्नी कुमुदिनी गावीत यांनी नटावद ता़ नंदुरबार, नवापुर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार भरत गावीत यांनी धनराट ता़ नवापुर, खासदार डॉ़ हीना गावीत यांनी नंदुरबार येथे मतदानाचा हक्क बजावला़
जिल्ह्यात 11 वाजेर्पयत 18 टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:06 PM