नंदुरबार : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील विद्याथ्र्याना एसटी महामंडळकडून सवलतीच्या दरात पासेस्चे वाटप करण्यात येत आह़े तळोदा, शहादा, नंदुरबार व नवापूर तालुक्यातील जवळपास 19 हजार 987 विद्याथ्र्याना सवलतीच्या दरात मोफत पासेस् उपलब्ध होत आहेत़ पासे्स घेण्यासाठी विद्याथ्र्याची मोठी गर्दी होताना दिसून येत आह़ेराज्यातील 180 दुष्काळी तालुक्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून विद्याथ्र्याना उर्वरीत शैक्षणिक वर्ष पुर्ण करण्यासाठी 15 नोव्हेंबर ते 15 एप्रिल दरम्यान मोफत एसटी पासेस् देण्यात येत आहेत़ या पूर्वी राज्य परिवहन महामंडळाकडून शैक्षणिक, तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण घेणा:या उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्याथ्र्याना शिक्षणासाठी मासिक पासेमध्ये 66.67 टक्के सवलत दिली जाते व विद्याथ्र्याकडून 33.33 टक्के रक्कम वसूल करण्यात येत असत़े परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या आदेशानुसार 2018-2019 मधील उर्वरीत शैक्षणिक वर्षार्पयत मासिक पासधारक विद्याथ्र्याकडून 33.33 टक्के रक्कमदेखील वसूल केली जाणार नसल्याची माहिती आह़े त्यामुळे साहजिकच 15 एप्रिल 2019 र्पयत मासिक पासधारक विद्याथ्र्याना मोफत शैक्षणिक प्रवासासाठी पासेस् देण्यात येणार आहेत़ दुष्काळामुळे विद्याथ्र्याच्या शिक्षणावर दुष्परिणाम व्हायला नको म्हणून महामंडळाकडून मासिक पासधारक विद्याथ्र्याना मोफत पासेस् देण्यात येत आहेत़जिल्ह्यात नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर हे चार तालुके दुष्काळी जाहिर करण्यात आलेले आहेत़ त्यामुळे या तालुक्यातून ग्रामीण भागात शिक्षणानिमित्त ये-जा करणा:या मासिक पासधारक विद्याथ्र्याना या सवलतीचा लाभ मिळणार आह़ेतालुकानिहाय मासिक पासधारक विद्याथ्र्याची संख्या - नंदुरबार 7 हजार 400, शहादा 10 हजार, तळोदा 737, नवापूर 1 हजार 850 इतकी मासिक पासधारक विद्याथ्र्याची संख्या आह़े दरम्यान, ही सवलत केवळ मासिक पासधारक विद्याथ्र्यासाठी असून जे विद्यार्थी पहिल्यांदाच नव्याने शैक्षणिक पास काढणार असतील त्यांच्यासाठी या सवलतीचा लाभ नसल्याचे परिवहन महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आह़े तसेच शिक्षणानिमित्त ग्रामीण भागात अप-डाऊन करणा:या विद्याथ्र्यानाच याचा लाभ मिळणार असून शहरी भागात याचा लाभ मिळणार नाही़ या शिवाय अहिल्याबाई होळकर, मानवविकास बसेस् आदी सवलतीदेखील कायम असल्याचे परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले आह़े 15 एप्रिल नंतरही मिळावा लाभदुष्काळी तालुक्यातील विद्याथ्र्याना 15 नोव्हेंबर ते 15 एप्रिल 2019 दरम्यानच सवलतीच्या दरात मासिक पास मिळणार आह़े त्यानंतर साहजिकच विद्याथ्र्याना उन्हाळी सुटय़ा लागत असल्याने एसटी महामंडळाने एप्रिलर्पयत सवलतीच्या दरात मासिक पास देण्याचे ठरवले आह़े परंतु जुनमध्ये शाळा सुरु झाल्यावर लगोलग दुष्काळग्रस्त तालुक्यांची स्थिती बदलणार नाही, पुढील वर्षी पुन्हा पाऊस लांबल्यास दुष्काळी चार तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्याची स्थिती बिकट होणार आह़े त्यामुळे जोवर जिल्ह्यातील दुष्काळी ढग दूर होत नाहीत, तोवर एसटी महामंडळाकडून विद्याथ्र्याना सवलतीच्या दरात पासेस देण्यात याव्या अशी मागणी विद्याथ्र्यासह पालकांकडून करण्यात येत आह़े दुष्काळी गावातील विद्याथ्र्याची पासेस्साठी होतेय गर्दीनंदुरबार, तळोदा, शहादा तसेच नवापूर तालुक्यातील विद्याथ्र्याची सवलतीच्या दरात पासेस् मिळवण्यासाठी संबंधित आगारावर मोठय़ा संख्येने गर्दी होताना दिसून येत आह़े शाळा सुरु होऊन काहीच दिवस झाले आहेत़ त्यामुळे बहुतेक विद्याथ्र्याचे दुस:या शैक्षणिक सत्रात हजेरी लावणे बाकी आह़े विद्याथ्र्याची पासेस् काढण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता अनेक आगारांकडून सवलतीच्या पासेसचे वितरण करण्यासाठी अतिरिक्त खिडकीची व्यवस्था करण्यात आली आह़े तसेच यासाठी स्वतंत्र कर्मचारीही नियुक्त करण्यात आले असल्याचे सांगण्यात आल़े
वीस हजार विद्याथ्र्याना सवलत पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 12:49 PM