लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांच्या लॉकडाऊन काळात जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण पथकाने जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून २० हजार जणांच्या एचआयव्ही टेस्ट केल्या होत्या़ यातील ५४ जणांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत़ त्यांच्यावर उपचार सुरू असून १० हजार गर्भवती मातांची नियमित चाचणी लॉकडाऊन काळात करण्यात आली होती़लॉकडाऊन काळात कोविड कक्षांना प्राधान्य देत असतानाच इतर आरोग्य सेवांनाही नियमित सुरू ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते़ त्यानुसार विविध विभागांचे कामकाज सुरू होते़ यात सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या एचआयव्ही तपासण्या जिल्ह्यात नियमित सुरू ठेवण्यात आल्या होत्या़ यात गर्भवती मातांना प्रथम प्राधान्य देण्यात आल्याने १० हजार मातांची तपासणी करुन त्यांना अहवाल पोहोचवले गेले होते़ लॉकडाऊन काळात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्याकडून एचआयव्ही टेस्ट होत असतानाच नियमित एचआयव्हीबाधित रुग्णांना घरपोच औषधी आणि किराणा पोहोचते करण्याचे कामही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून करण्यात आले आहे़ यातून आजारी असलेल्यांना मोठा आधार मिळाला असून अद्यापही दर महिन्याला लागणाऱ्या गोळ्या घरपोच करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या एचआयव्ही बाधितांना कोरोनाचा खरा धोका असल्याने पथक आणि सामाजिक संस्था यांच्याकडून बाधितांसोबत सातत्याने संपर्क करुन त्यांना माहिती देण्यात येत होती़ यामुळे आजअखेरीस एकाही एचआयव्हीबाधिताला कोरोना संसर्ग झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे़ लॉकडाऊनदरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ रघुनाथ भोये व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ के़डी़सातपुते यांच्या मार्गदर्शनात जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलिक, जिल्हा पर्यवेक्षक विश्वास सूर्यवंशी, सामाजिक संस्थेचे रवि गोसावी, आशा माळी यांनी लॉकडाऊन काळात एचआयव्हीबाधितांसाठी विशेष अभियान राबवले होते़ यांतर्गत देहविक्री करणाºया ३० महिला, ४८ समलिंगी संबध ठेवणारे पुरूष, ४५६ एचआयव्हीबाधितांना एआरटी औषधोपचार कीट घरपोच पुरवण्यात आले होते़ दरम्यान २२० मुलांना न्यूट्रीशन कीटचेही वाटप करण्यात आले होते़ परगावी तसेच बाहेर राज्यात अडकलेल्या रुग्णांनादेखील जिल्हा रुग्णालयाच्यामार्फत तात्पुरत्या स्वरूपात एआरटी उपचार मिळवून देण्यात आले आहेत़ देहविक्री करणारे महिला आणि पुरूष अशा २०० लोकांना लॉकडाऊन काळात किराणा तसेच अन्नधान्य देण्यात आले़ १ एप्रिल ते ३० जून या काळात १० हजार ४३६ गरोदर मातांच्या एचआयव्ही टेस्ट करण्यात आल्या होत्या़ यातील तीन माता ह्या एचआयव्ही बाधित असल्याचे समोर आले होते़ त्यांना उपचार देण्यात येत आहेत़ दरम्यान १० हजार ५७० जणांनी एचआयव्ही टेस्ट करुन घेतली होती़ यातील ५१ जण हे एचआयव्ही बाधित आहेत़ यातील ५० जणांना गोळ्या व औषधी पुरवठा सुरू करण्यात आला आहे़ जुलै महिन्यातही एचआयव्हीच्या नियमित चाचण्या सुरूच होत्या़ गर्भवती मातांच्याही नियमित टेस्ट करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ निराधार असलेल्या ३४ एचआयव्हीबाधितांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे़जिल्ह्यात एचआयव्ही बाधितांना लॉकडाऊन काळात नैराश्य घेरु नये यासाठी समुपदेशक सातत्याने ंच्यासोबत संपर्क करुन माहिती देत होते़सामाजिक संस्थांच्या मदतीने एचआयव्हीबाधितांसाठी तीन महिने राबवलेले उपक्रम यशस्वी झाले आहेत़ घरपोच औषधी, न्यूट्रीशन कीट तसेच तपासण्या सुरू आहेत़ कोरोना योद्धे म्हणून काम करताना कर्मचारी एचआयव्हीबाधितांसाठी काम करुन मेहनत घेत आहेत़-नितीन मंडलिक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, एड्स नियंत्रण पथक़
लॉकडाऊनच्या काळात २० हजार एचआयव्ही टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:34 PM