जळगाव : नवीन बसस्थानकाच्या मागील ओंकार नगरात रविवारी सकाळी वृक्षाच्या फांद्या तोडण्यात आल्या. वृक्षतोडबाबत 2011 मध्ये परवानगी घेण्यात आली होती, त्यानंतर तब्बल चार वर्षानंतर फांद्या तोडण्यात आल्या. विजेच्या तारांना अडथळा ठरत असल्याने मनपाची परवानगी घेऊनच झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या असल्याचे डॉ़ मुर्तूजा अमरेलीवाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास एक माणूस गुलमोहराच्या मोठय़ा झाडावर चढून कु:हाडीने फांद्या छाटत होता़ याबाबत कामगाराला परवानगी बद्दल विचारणा केली असता त्याने परवानगी घेतली असल्याचे सांगत परवानगीचे पत्र दाखविल़े मात्र ही परवानगी मुळ मालक डॉ़ अमरेलीवाला यांच्या नावाने नसून भूखंड विक्र ी करणा:या (जगन्नाथ पंडित पाटील, शारदा कॉलनी, महाबळ) यांच्या नावाने 2011 मध्ये घेण्यात आलेली आह़े परवानगी घेतल्यानंतर चार वर्षानी वृक्षांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. जागा खरेदी करताना मूळ मालकाने 9 वृक्ष तोडण्याची परवानगी घेऊन दिली होती़ मात्र आपण आवश्यकता नसल्याने झाडे तोडली नाहीत़ रविवारी फांद्या छाटल्या असल्याचे डॉ़ अमरेलीवाला यांनी सांगितल़े
परवानगी 2011ची फांद्या छाटल्या 2015मध्ये
By admin | Published: October 19, 2015 12:13 AM