नंदुरबार : धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे संयुक्त इन्स्पायर अॅवार्ड विज्ञान प्रदर्शनाला मंगळवारपासून नंदुरबारात सुरुवात झाली. एकुण 258 उपकरणे सहभागी झाली असून त्यात नंदुरबार जिल्ह्यातील 217 उपकरणांचा सहभाग आहे. खासदार डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विज्ञान तंत्रज्ञान विभाग व राज्य विज्ञान संस्था, माध्यमिक शिक्षण विभाग नंदुरबार व धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने डी.आर.विद्यालयात इन्स्पायर अॅवार्ड विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक होते. नंदुरबारचे शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, धुळ्याचे प्रविण अहिरे, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, गट शिक्षणाधिकारी डॉ.सी.के.पाटील, संस्थेचे चेअरमन गिरीष खुंटे, नरेंद्र सराफ, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक दिनेश देवरे, मुख्याध्यापक संघ अध्यक्ष मुकेश पाटील, सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, मुख्याध्यापक प्रकाश पिंपळे, उपमुख्याध्यापक अतुल जोशी, पंकज पाठक, श्रीराम मोडक, भारती सुर्यवंशी, नारायण भदाणे, कपुरचंद मराठे, महेंद्र फटकाळ आदी उपस्थित होते. प्रदर्शनात नंदुरबार-धुळे जिल्ह्यातील एकुण 258 उपकरणे सहभागी होणार आहेत. पैकी 217 उपकरणांची नोंद पहिल्या दिवशी पहावयास मिळाली. सदर प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे. जिल्ह्यातील शाळांमधील विद्याथ्र्यासाठी बुधवारपासून प्रदर्शन पहाण्यास खुले होणार आहे. तीन दिवस हे प्रदर्शन सुरु राहणार आह़े खासदार डॉ.हिना गावीत यांनी देश विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करीत असून नवसंशोधकांनी देखील या क्षेत्रात अधीक सक्रीय होऊन आपल्यातील वैज्ञानिक जाणिवा सिद्ध कराव्या असे आवाहन केले. या उपकरणांचे परीक्षण डॉ. डी.एस सोनवणे, सुहास भावसार, उमेश भदाणे, कपुरचंद मराठे हे करत आहेत़ प्रास्ताविक मच्छिंद्र कदम यांनी केले. सूत्रसंचालन हेमंत खैरनार तर आभार उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी केले.
बाल संशोधकांच्या जिज्ञासेतून घडलेल्या 217 ‘शोधांनी’ वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 1:03 PM