लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 18 : कजर्माफीस पात्र ठरलेल्या शेतक:यांचे जून 2016 ते जुलै 2017 या एक वर्षाचे व्याज देखील माफ झाल्याने जिल्ह्यातील 22 हजार शेतक:यांचा सातबारा कोरा होणार आहे. दरम्यान, कजर्मुक्तीस पात्र असलेले परंतु पूर्वी योजनेत ऑनलाईन अर्ज न केलेल्या शेतक:यांना 31 मार्चची शेवटची मुदत असून आतार्पयत दीड हजार शेतक:यांनी अर्ज केल्याचे समजते.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कजर्मुक्ती जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत एप्रिल 2009 ते मार्च 2016 र्पयत उचल केलेल्या पीक मध्यममुदत कर्जाची जून 2016 रोजी थकीत झालेल्या रक्कमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून जुलै 2017 र्पयत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची रक्कम दीड लाखार्पयत कजर्माफीस पात्र धरण्यात आली आहे. तसेच पीक मध्यम मुदत कर्जाच्या मुद्दल व व्याजासह दीड लाखार्पयतची थकबाकी असलेल्या शेतक:यांसाठी एकवेळ समझोता योजना जून 2016 रोजी थकीत झालेल्या रक्कमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून जुलै 2017 र्पयत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची किमान दीड लाखार्पयत रक्कम पात्र करण्यात आलेली आहे. परंतु या कालावधीतील रक्कमेवर राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँकांनी व्याजाची अकारणी केली होती. त्यामुळे कजर्माफीस पात्र असूनही अशा शेतक:यांचा सातबारा नील झाल्याचे दिसून येत नव्हते. ही बाब लक्षात घेता शेतक:यांमध्ये ओरड होती. त्यामुळे शासनाने नुकताच अध्यादेश काढून जिल्हा बँका व विकासो संस्थांनी व्याज अकारणी न करण्याचे निर्देश दिले आहेत.22 हजार शेतकरीजिल्ह्यात या निर्णयाचा 22 हजारापेक्षा अधीक शेतक:यांना लाभ होणार आहे. यापैकी 80 टक्के शेतकरी हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खातेदार होते तर 20 टक्के शेतकरी हे राष्ट्रीयकृत बँकांचे खातेदार होते. राष्ट्रीयकृत बँकांच्या अद्यापही अनेक खातेदार शेतक:यांना कजर्माफीची प्रतिक्षा कायम आहे. उर्वरित शेतक:यांसाठी..कजर्माफी योजनेत पात्र असतांनाही मुदतीत ऑनलाईन अर्ज न करू शकणा:या शेतक:यांना 31 मार्च ही शेवटची मुदत अर्ज भरण्यासाठी देण्यात आली आहे. या मुदतीत अर्ज भरण्यासाठी शेतक:यांचा अद्यापही पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतक:यांना त्याची माहितीच नसल्याचे चित्र तळोदा, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेवटच्या काही दिवसात तरी याबाबत जनजागृती करून जास्तीत जास्त शेतक:यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रय} करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.तांत्रिक अडथळे..महाईसेवा केंद्रात या योजनेअंतर्गत मोफत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा असतांनाही अनेक ठिकाणी मात्र शेतक:यांची अडवणूक केली जात आहे. कधी तांत्रिक अडथळे अर्थात इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्याचे दाखविले जात आहे. तर कधी संबधीत साईटच ओपन होत नसल्याचे शेतक:यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी वंचीत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नंदुरबारातील 22 हजार शेतक:यांचा सातबारा होणार कोरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:47 PM