लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 28 : मोड, ता.तळोदा येथे किराणा दुकानातून चोरटय़ांनी 22 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली.मोड येथील भरचौकात असलेल्या योगेश रामराव पाटील यांच्या किराणा दुकानातून चोरटय़ांनी 27 मार्चच्या पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास साडेतीन हजार रुपये रोख व दुकानातील किराणा मालासह 22 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत पाटील यांनी बोरद पोलीस दूरक्षेत्रात तक्रार केली असून जमादार जेरमा पावरा व एकनाथ ठाकरे यांनी पंचनामा केला. दरम्यान, 26 मार्च रोजीही बोरद व मोड परिसरातील सुमारे 35 शेतक:यांच्या शेतातील सबमर्सिबल पंपाची केबल चोरटय़ांनी चोरून नेली. तसेच मागील महिन्यात मोड येथील गोपाळ न्हावी, किरकोळ दुकानदार व पानटपरीतून चोरी केल्याची घटना घडल्या. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांची भेट घेऊन गावात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केली.
मोड येथे किराणा दुकानातून 22 हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:25 PM