लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन आणि पोलीस दल प्रयत्नशील आह़े सलोखा अबाधित रहावा यासाठी पोलीस दलाकडून सोशल मिडियावर 24 तास लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती शांतता कमिटीच्या बैठकीत देण्यात आली़ अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे होत़े यावेळी पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपनगराध्यक्ष परवेज खान, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, भारिपचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे, शिवसेनेचे दिपक गवते, संतोष पाटील, मोहन माळी, माणिक माळी, रेव्हरंड अनुप वळवी, आरिफ पठाण यांच्यासह नंदुरबार शहरातील विविध मान्यवर व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होत़े बैठकीत येत्या आठ जुलै रोजी धार्मिक व जातीय अत्याचार विरोधी मंचतर्फे देशात घडणा:या मॉब लिचिंगच्या घटनांचा विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता़ हा मोर्चा मंचतर्फे स्थगित करण्यात यावा, असे आवाहन पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी बैठकीत केल़े पोलीस अधिक्षक पाटील म्हणाले की, पोलीस दलाकडून सर्वच शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था योग्यरितीने हाताळली जात आह़े अनुचित प्रकार घडू नयेत, तसेच गुन्हेगारांवर वॉच ठेवला जावा म्हणून सीसीटीव्हीसाठी लागणा:या निधीची मागणी केली आह़े यांतर्गत निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही त्रुटी राहिल्या आहेत़ त्या लवकरच दूर होऊन जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालयात सीसीटीव्ही लावण्याचे काम सुरु होणार असल्याची माहिती त्यांनी दिली़ शांतता कमिटीच्या बैठकीत आलेल्या काही सदस्यांनी 2 जुलै रोजी झालेल्या मूकमोर्चात सहभागी नसतानाही पोलीस दलाने नोटीसा बजावल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली होती़ त्यावर पोलीस दलातर्फे स्पष्टीकरण देताना अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी बजावलेल्या नोटीसा केवळ दक्षता म्हणून दिल्या गेल्या असून त्याद्वारे सतर्कता बाळगण्याचे सूचित करण्यात आले असल्याचे सांगत सदस्यांचे समाधान केल़े प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, भारिपचे अरुण रामराजे यांच्यासह समिती सदस्यांनी मनोगत व्यक्त करत शहरातील सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली़ आभार उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांनी मानल़े जिल्हाधिकारी मंजुळे यांनी उपस्थितांसोबत संवाद साधताना सीसीटीव्ही कॅमे:यांसाठी जिल्हा नियोजन किंवा सीएसआर फंडातून निधी देण्याची तरतूद करण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत चर्चा करणार असून सर्व नगरपालिकांच्या निधीचाही वापर करणार असल्याची माहिती दिली़ गंभीर गुन्ह्यातील गुंडांना तडीपार करण्यासंबधी येत्या काळात कारवाई करणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितल़े दरम्यान पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आठ जुलै रोजी धार्मिक व जातीय अत्याचार विरोधी मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला स्थगिती देत त्याऐवजी धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती मंचच्या पदाधिका:यांनी दिल़े याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना बैठक संपल्यानंतर दिल़े निवेदनानुसार मोर्चाऐवजी मंचतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन होणार आह़े
सोशल मिडियावर पोलीस दल ठेवणार 24 तास लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:08 PM