लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : दिव्यांगांसाठी सहाय्यक उपकरण पुरविणे व राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या तपासणी शिबिरात 252 नागरीकांची तपासणी केली.शहरातील श्री शिवाजी हायस्कूल येथे भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयांतर्गत दिव्यांग सशक्तीकरण विभागाकडून कृत्रिम अंगनिर्माण एककाकडून दिव्यांगांना सहाय्यक उपकरण पुरविणे व राष्ट्रीय वयोश्री योजनेचे तपासणी शिबीर घेण्यात आले होते. कार्यक्रमात गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, गटशिक्षण अधिकारी डॉ.राहुल चौधरी, विस्तार अधिकारी रमेश चौरे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, डॉ.किरण पावरा, डॉ.सोनार, पालिकेचे कार्यालय अधीक्षक मिलिंद भामरे व प्रकल्प अधिकारी प्रशांत भट उपस्थित होते. ग्रामसेवक, शिक्षक व आशा कार्यकर्ती यांच्याकडून ग्रामस्तरावर शिबिराची व शिबिरासाठी लागणा:या कागद पत्रांची माहिती देण्यात आली होती, असे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी सांगितले. शिबिरातील तपासणीत दिव्यांगांना आढळून आलेल्या त्रासानुसार त्यांना येत्या काही दिवसात साहित्याचे वाटप करण्यात येईल. त्यासाठी आयोजिय स्वतंत्र वाटप शिबिरास दिव्यांग पालक व विद्यार्थी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वाळेकर यांनी केले. डॉ.किरण पावरा यांनी एडीसीपी योजेनेंतर्गत दिव्यागांना साधन साहित्य पुरवठय़ाची व ज्येष्ठ नागरीकांना राष्ट्रीय वयश्री योजेनेंतर्गत मिळणा:या लाभाची माहिती दिली. गटशिक्षण अधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. प्रस्तावना व सूत्रसंचालन विस्तार अधिकारी रमेश चौरे यांनी केले. शिबिरासाठी नवापूर तालुक्यातील सर्व शिक्षा अभियानाचे साधन व्यक्ती व विषय तज्ञ, नवापूर पालिकेच्या कर्मचा:यांनी परिश्रम घेतले. शिबिरात दिव्यांग, अस्थिव्यंग, कर्णबधीर, दंत तपासणी, डोळे तपासणी अशी वेगवेगळी तपासणी करुन दिव्यांग व ज्येष्ठ नागरीकांना उपयुक्त साधने केंद्र सरकारमार्फत लवकरात लवकर वाटप करण्यात येणार आहे.
नवापुरात 252 दिव्यांगांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 12:54 PM