ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि. 16- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज करणा:या जिल्ह्यातील 47 हजारपैकी कजर्मुक्तीसाठी 20 हजार शेतकरी पात्र ठरवले गेले होत़े यातील केवळ 265 शेतक:यांच्या कजर्मुक्तीची रक्कम शासनाने जिल्हा बँकेकडे वर्ग करून देत त्यांचा सन्मान केला आह़े नंदुरबार जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ऑक्टोबर महिन्यात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत 120 शेतक:यांची पहिली ग्रीन यादी जाहिर करण्यात आली होती़ यात 20 शेतक:यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करत पात्र ठरलेल्या 20 हजार 125 शेतक:यांची यादी राज्यस्तरावरून लवकरच जाहिर होणार अशी घोषणा झाली होती़ प्रत्यक्षात या गोष्टीला आता महिन्याचा कालावधी उलटूनही याद्या जाहिर झालेल्या नाहीत़ ग्रीन यादीतही जिल्हा बँकेचे 71 तर तीन राष्ट्रीयकृत बँकाच्या 265 कजर्दार शेतक:यांना कजर्मुक्तीचा लाभ देण्यात आला आह़े या कजर्मुक्तीची रक्कम बँकाकडे वर्ग करण्यात आल्याचे पत्र पोहोचवण्यात आले आह़े तीन राष्ट्रीयकृत बँकांच्या नऊ शांखांमध्ये पैसे वर्ग झाले असले तरी उर्वरित 63 शाखांमध्ये अद्याप कोणत्याही प्रकारचे पत्र किंवा तत्सम माहिती देण्यात आलेली नसल्याने उर्वरित शेतकरी अद्यापही टांगणीला लागले आहेत़ उर्वरित शेतक-यांच्या अर्जावर कामकाज नंदुरबार जिल्ह्यातील 71 शेतक:यांच्या कजर्मुक्तीचे एकूण 23 लाख 67 हजार 249 रूपये धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा बँकेच्या नंदुरबार विभागाचे व्यवस्थापक सी़बी़वाघ यांनी दिली आह़े उर्वरित शेतकरी पात्र होण्याची कारवाई सुरू झाल्यानंतर इतरांचे पैसे शासनाकडून जमा होण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली़ नंदुरबार जिल्ह्यातील 12 राष्ट्रीयकृत बँकांच्या 72 शाखांपैकी युनियन बँकेच्या चार, स्टेट बँकेच्या चार आणि बँक ऑफ बडोदाची एक अशा नऊ शाखांमध्ये 265 शेतक:यांचे कर्जापोटी थकीत असलेले दोन कोटी 14 लाख 48 हजार रूपये शासनाने वर्ग केल्याची माहिती देण्यात आली आह़े उर्वरित अर्जावर अद्यापही कामकाज सुरू आह़े