शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Vidhan Sabha 2019: 3,497 शाईच्या बाटल्यांचा होणार वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:35 PM

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतदानासाठी एकुण तीन हजार 497 शाईच्या बाटल्या लागणार ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतदानासाठी एकुण तीन हजार 497 शाईच्या बाटल्या लागणार आहेत. प्रशासनाचे मागणी केल्यानुसार शाईच्या बाटल्या उपलब्ध झाल्या आहेत. दरम्यान सर्वात जास्त 967 बाटल्या नंदुरबार तर सर्वात कमी 794 बाटल्या अक्कलकुवा मतदारसंघाला लागणार    आहेत.    मतदान केल्याची निशानी दाखविण्यासाठी तजर्णीला लावलेली शाईची रेष दाखवून अनेकांना सेल्फी किंवा फोटो काढून तो सोशल मिडियावर टाकण्याची भारी हौस असते. परंतु ही शाई कशी येते, विशिष्ट बोटालाच का लावली जाते, किती लिटर शाई येते, तिचा वापर किती दिवसापुरता होऊ शकतो याची माहिती मात्र, सामान्य मतदाराला नसते. या शाईची मोठी रंजक कहानी देखील आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चार मतदारसंघात एकुण 34 लिटर 970 मि.ली. शाई लागणार आहे. ती उपलब्ध देखील झाली आहे.एका बाटलीत दहा मि.ली.मतदानासाठी वापरण्यात येणा:या एका शाईच्या बाटलीत दहा मिलिलिटर शाई असते. एका मतदान केंद्रात किमान एक  तर जास्तीत जास्त तीन बाटल्या द्याव्या लागतात. अर्थात मतदारांची संख्या त्या केंद्रावर किती यावरून शाईच्या बाटल्यांची संख्या देखील ठरविली जाते. दहा मि.ली.ची एक बाटली सांभाळण्याची कसरत मात्र निवडणूक कर्मचा:याला करावी लागते. तजर्नीला उभी रेषमतदान करण्यासाठी आलेल्या मतदाराला डाव्या हाताच्या आधी तजर्नीला नखावर अर्धी आणि त्यावरील भागात अर्धी अशी रेष मारावी लागते. पूर्वी केवळ ठिपका ठेवला जात होता. परंतु 2006 नंतरच्या सर्व निवडणुकांमध्ये ठिपका ऐवजी रेष स्वरूपात शाई लावली   जात आहे. यामुळे ती पुसण्याचा संभव    नसतो.आवश्यकतेपेक्षा अधीक मागणीमतदार संख्या लक्षात घेवून किती शाईच्या बाटल्या लागतील याचा अंदाज बांधला जातो. त्यापेक्षा दहा टक्के अधीक शाईच्या बाटल्यांची मागणी नोंदविली जाते किंवा संबधीत विभाग थेट पाठवून देत   असतो. मतदानाच्या वेळी शाईची बाटली पडणे, शाई सांडणे किंवा इतर कारणामुळे शाई    वाया गेल्यास लागलीच पर्यायी शाईची बाटली उपलब्ध व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो. परंतु शाई वाया गेल्यास व दुसरी बाटली मागविल्यास संबधीत कर्मचा:याला अनेक बाबींचा खुलासा करावा लागत   असतो.   

बाटलीमधील शाई किमान 24 तास ओली असते. त्यानंतर ती सुकण्यास सुरुवात होते. त्यामुळे एकदा फोडलेली शाईची बाटलीमधील शाई दुस:यांदा  उपयोग करता येण्याजोगी नसते. किमान 15 व जास्तीत जास्त 30 टक्के शाई वाया जात असते. याला कारण मतदानाची टक्केवारी. जितके जास्त मतदान तेवढय़ा जास्त शाईचा वापर होत असतो.

मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या हाताच्या तजर्नीवर शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. जर तजर्नीवर शाई लागलेली असेल तर त्या मतदाराला मतदान करू दिले जात नाही. निवडणूक कर्मचा:याला शाई अधीक जपून वापरावी लागत    असते.  

 12,24,429 मतदारांना 34 लिटर 970 मि.ली. इतकी लागणार शाई4एका बाटलीत 10 मि.ली.इतकी  शाई असते. एका बाटलीतून किमान 350 जणांच्या बोटाला शाई पुरेल असे गणित असते. ही बाब लक्षात घेता 12 लाख 24 हजार 429 एवढय़ा मतदारांना 3,497 शाईच्या बाटलीमधील 34 लिटर 970 मि.ली. इतकी शाईचा उपयोग केला जाणार आहे. संपूर्ण देशात मतदानाच्या वेळी म्हैसूरची शाई वापरण्यात येते. येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये ती तयार होते. या कंपनीपासून जगातील 25 देशांना निवडणूक शाईचा पुरवठा केला जातो. 

अक्कलकुवा मतदारसंघात एकुण 349 मतदान केंद्रांवरून 2,77,917 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. या मतदारांसाठी एकुण 794 शाईच्या बाटल्या लागणार आहेत. शहादा मतदारसंघात 3,20,273 मतदारांकरीता 339 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. या मतदारसंघात एकुण 915 शाईच्या बाटल्या लागणार आहेत. नंदुरबार मतदारसंघात मतदारसंख्या सर्वाधिक 3,38,625 मतदारांसाठी 361 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांवर एकुण 967 शाईच्या बाटल्या पुरविण्यात येणार आहेत.नवापूर मतदारसंघात 2,87,614 मतदार आहेत. या मतदारांकरीता एकुण 336 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली असून या ठिकाणी 821 शाईच्या बाटल्या पुरविण्यात येणार आहेत.