लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होत़े यात 36 प्रकरणांवर चर्चा करुन ते निकाली काढण्यात आल़े प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमोद एस़ तरारे, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस़टी़ मलिये विशेष लोक अदालतीसाठी उपस्थित होत़े लोक अदालतीत धनादेशांच्या अनादर व चलनक्षम दस्तावेजांची प्रकरणे दाखल करण्यात आली होती़ न्यायालयात कनिष्ठस्तर सहायक दिवाणी न्यायाधीश एऩबी़पाटील यांनी पॅनलप्रमुख म्हणून काम पाहिल़े अॅड़ व्ही़एस़सोनार व आऱए़ मोरे यांनी काम पाहिल़े त्यांच्याकडून विविध प्रकरणांवर चर्चा करण्यात येऊन तक्रारदार आणि थकबाकीदार यांच्यात तडजोडी करुन कायदेशीर कार्यवाही करण्यात आली़ यावेळी 39 प्रकरणे निकाली काढण्यात आली़ यातून तडजोडीअंती 43 लाख 46 हजार 966 रुपयांची वसुली करण्यात आली़ तळोदा, अक्कलकुवा, नवापुर व शहादा न्यायालयातही हा उपक्रम झाला़
विशेष लोकअदालतीत 36 प्रकरणांवर तडजोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 12:33 PM