शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शहरी अन् ग्रामीण भागातून समोर आले डेंग्यूचे 40 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:04 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी डेंग्यूचा प्रभाव कायम असून डेंग्यूचे 40 रुग्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी डेंग्यूचा प्रभाव कायम असून डेंग्यूचे 40 रुग्ण खाजगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल आहेत़ रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी  आरोग्य यंत्रणेने उपाययोजनांना वेग दिल्याची माहिती देण्यात आली आह़े डेंग्यूच्या साथीमुळे शहरी भागातील नागरिक त्रस्त असतानाच मंगळवारी दिवसभरात ग्रामीण भागात डेंग्यूचा फैलाव झाल्याचे आरोग्य यंत्रणेने संकलित केलेल्या रक्तनमुन्यांच्या अहवालातून समोर आले आह़े सर्वाधिक प्रभावित क्षेत्र असलेल्या नंदुरबार शहरात पालिकेने गेल्या दोन दिवसात दक्षता घेत कामांना वेग दिला आह़े आजअखेरीस डेंग्यूचे संशयित रुग्ण असलेल्या गाजीनगर, राजीव गांधीनगर, कुरेशी मोहल्ला, बागवान गल्ली, मच्छीमार्केट, संभाजीनगरसह शहरातील 150 जागा निश्चित करुन तेथे धूरफवारणी करण्यात आली आह़े शहरात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एऩडी़बोडके यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागा 36 कर्मचारी 16 पथकांमधून जागोजागी भेटी देत डेंग्यूच्या डासांचा शोध घेत आहेत़ यात प्रामुख्याने सव्रेक्षण करुन रक्तनमुने घेतले जात आहेत़ येत्या दोन दिवसात शहरातील सर्वच ठिकाणे सव्रेक्षण करुन साथ आटोक्यात आणण्याचे उद्दीष्टय़ ठेवल्याचे सांगण्यात आले आह़े एकीकडे आरोग्य विभाग उपाययोजनेत मगA असली तरी डेंग्यूचे रुग्ण समोर येणे थांबत नसल्याचे दिसून आले आह़े जिल्हा रुग्णालयात विविध वॉर्डात तापाचे 10 संशयित रुग्ण दाखल असून डेंग्यूची लागण झालेल्या तिघांवर यापूर्वीच उपचार सुरु आहेत़ मंगळवारी डेंग्यूची बाधा झालेल्या एका रुग्णास प्रशासनाने तातडीने धुळे येथे हलवल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान खाजगी रुग्णालयात तापाची लागण झालेले 77 च्या जवळपास रुग्ण दाखल आहेत़ त्यांच्या रक्तनमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा असल्याने रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आह़े  जिल्ह्यात डेंग्यूची स्थिती गंभीर असल्याने मंगळवारी नाशिक विभागीय साथरोग संचालक डॉ़ अर्चना पाटील यांच्यासह विभागीय अधिका:यांच्या पथकाने भेट देत माहिती जाणून घेतली़ त्यांनी तळोदा, नवापुर आणि नंदुरबार शहरातील रुग्णालयांमध्ये भेटी देत पाहणी केली़ 

आजअखेरीस आरोग्य पथकांनी चार तालुक्यातून 562 रक्तनमुने संकलित केले होत़े यात 40 जणांना डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाल़े सर्वाधिक गंभीर स्थिती नंदुरबार शहराची असून 11 जणांना डेंग्यू झाल्याचे समोर आले आह़े 139 संशयित रुग्णांची शहरात तपासणी करण्यात आली होती़ शहराला लागून असलेल्या ग्रामपंचायत हद्दींमधील वसाहतींमध्ये दोघांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आह़े 

आरोग्य पथकांनी नवापुर तालुक्यात 204 रक्तनमुने तपासले होते यात 20 जणांना डेंग्यू असल्याचे सांगण्यात आले आह़े नवापुर शहरात दोघे डेंग्यूने बाधित आहेत़ शहादा शहरात 1, तळोदा तालुक्यात 2 रुग्ण डेंग्यूने बाधित आहेत़ सर्वाधिक 216 रक्तनमुने हे नंदुरबार शहर व परिसरात घेण्यात आले होत़े येत्या दोन दिवसातही रक्तनमुन्यांचे संकलन सुरु राहणार असल्याची माहिती आह़े