राधेश्याम कुलथे । ब्राrाणपुरी : तोरणमाळ येथील यशवंत तलावात मासेमारी करताना युवकांना 45 किलो वजनाचा सिल्व्हर जातीचा मासा आढळल्याने पर्यटकांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.याबाबत वृत्त असे की, महाराष्ट्रातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे यशवंत तलाव आहे. या तलावात नेहमी युवक मासेमारी करतात. मासेमारी करताना जाळीत अचानक सुमारे 45 किलो वजनाचा सिल्व्हर जातीचा मासा अडकला. हा मासा पाहण्यासाठी तेथे आलेल्या पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. हा मासा एका विक्रेत्याला विकला. 45 किलोचा मासा या तलावात आढळला. तोरणमाळ येथील यशवंत तलावात मासेमारी करण्याचे टेंडर ग्रामपंचायतीमार्फत पाच वर्षासाठी दिले जाते. तलावात मासळीचे बीज टाकले जाते. या तलावात 15 ते 20 किलो वजनाचा गोलवा, लालपरी, आफ्रिकन, पोप्लेट असे मासे नेहमी आढळतात. त्याचबरोबर 50 किलो व त्यापेक्षा जास्त वजनाचे मासे अधून-मधून आढळतात. 45 किलो वजनाचा हा मासा पाहताच मासेमारी करणा:या युवकांनी एकच आरडाओरडा करीत तेथील स्थानिक जाणकार नागरिकांना बोलवून त्यांनी हा मासा सिल्व्हर जातीचा आहे, असे स्पष्ट केले. हा मासा खूप कमी प्रमाणात या तलावात आढळतो, असे जाणकारांकडून सांगण्यात आले.
तोरणमाळ येथील यशवंत तलावात आढळला 45 किलोचा मासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:01 PM