शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

धडगाव येथील विज्ञान प्रदर्शनात 50 उपकरणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 5:29 PM

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन : विद्याथ्र्यानी वैज्ञानिक दृष्टीकोण जोपासण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : तालुक्यातील कुंडल येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती कालुसिंग पावरा यांच्या  हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात तालुक्यातील शाळांनी  एकूण 50  उपकरने मांडली होती. धडगाव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, पंचायत समिती शिक्षण विभाग व तालुका विज्ञान मंच यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात             आले. प्रथम भारतर} डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलम यांच्या प्रतीमेचे पूजन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सदस्य हारसिंग पावरा, सरपंच पाचा पाडवी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाडवी, पं.स. सदस्य गौतम वसावे, गटशिक्षणाधिकारी  जे.ए.चौरे, शिक्षण विस्तार अधिकारी राजपूत, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के.जी पाठक, सचिव प्रवीण बोरसे, भरत पावरा, यु.के.पाडवी, दमयंती तडवी नगीन  पाटील उपस्थित होते.बक्षीस वितरण समारोपाला अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे हे होते. आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात ते म्हणाले की, विज्ञान विचार प्रत्येक विद्याथ्र्याच्या मनात रुजण्यासाठी शालेय विज्ञान प्रदर्शन महत्वाची भूमिका बजावत असते. मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास घडविण्याचा विकास हा शाळेत होत असतो. विद्याथ्र्याना नासा सारख्या संस्थेत बाल वैज्ञानिक म्हणून काम करण्याची संधी मिळत़े याकडे लक्ष घातले पाहिजे, प्रत्येकात वैज्ञानिक दृष्टीकोन आहे, अडचण आहे ती फक्त भाषेची. भाषिक अडचण ही अभेद्य भिंत नाही तिची सोडवणूक करता येवू शकते. असे मार्गदर्शन करण्यात आल़े दुर्गम भागातील विद्याथ्र्यानी विज्ञान प्रदर्शनात हिरारीने सहभाग घेण्याचे आवाहन शिक्षण विस्तार अधिकारी शीलवंत  वाकोडे यांनी केले. विद्याथ्र्यानी वैज्ञानिक दृष्टीकोणाने प्रत्येक घटनेकडे बघितल्यास आपण अंधश्रध्येचे बळी ठरणार नाही असे मत परीक्षक नगिन पाटील यांनी मांडले.या प्रदर्शनात प्राथमिक व माध्यमिक असे दोन गट विद्याथ्र्यासाठी करण्यात आले होत़े तर शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्याचा वेगळा गट  करण्यात आला. प्रदर्शनात  प्रामुख्याने कृषी, पर्यावरण, अपारंपारिक उर्जा, स्वच्छता व आरोग्य, आपत्कालीन व्यवस्था, अन्न सुरक्षा, वैज्ञानिक कुतूहल यासह महत्वाच्या शाळा उपयोगी उपकरणांचा प्रामुख्याने समावेश होता. अतिदुर्गम भागातील शाळेतील विद्याथ्र्यानी तयार केलेल्या  या उपकरणांनी उपस्थितांना भारावून टाकल़े बालवैज्ञानिकांचे मान्यवरांनी कौतुक केले. उपकरणांचे परीक्षण एन.व्ही.पाटील, एस.बी. पाटील, आर.डी.माळी, पी.एच. सोनवणे, एम.पी. पाटील यांनी केले. सुत्रसंचालन भरत शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन सचिन जळोदकर यांनी मानल़े