लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी विकास महामंडळातून सेवानिवृत्त कर्मचा:याचे वेतनवाढ व फरकाचे बिल काढण्यासाठी त्याच कार्यालयातील महिलेसह पुरुष कर्मचा:याने प्रत्येकी 25 हजार रुपयांची मागणी केली होती़ सेवानिवृत्ताच्या तक्रारीनंतर दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली़ आदिवासी विकास महामंडळातून डिसेंबर 2018 मध्ये कनिष्ठ सहायक पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या 59 वर्षीय व्यक्तीकडून नंदुरबार शहरातील आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयातील लेखापाल संतोष बहादूर आमटे व उपप्रादेशिक व्यवस्थापक किरण बाळू गाढे या महिला अधिकारीने प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ सुधारित सेवा प्रगती योजनेंतर्गत सेवानिवृत्ताची वेतनवाढ व फरकासह 11 लाख 42 हजार 805 रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी दोघांनी ही लाच मागितली होती़ लेखापाल आमटे याने धनादेश तर उपप्रादेशिक व्यवस्थापक किरण गाढे हिने रोख स्वरुपात पैश्यांची मागणी केली होती़ या संदर्भात सेवानिवृत्ताने नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक शिरीष जाधव यांच्याकडे तक्रार केली होती़ त्यानुसार बुधवारी ही कारवाई करण्यात आली़ उपअधिक्षक शिरीष जाधव व पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्यासह अधिकारी व कर्मचा:यांनी ही कारवाई केली़
50 हजाराची लाच मागणारे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:35 PM