नंदुरबार : गॅस असल्यास रॉकेल देण्यात येऊ नये असा नियम पुरवठा विभागाने यापूर्वी लागू केला आह़े तरीही पुरवठादारांकडून गॅसधारकांना रॉकेल वितरण केल्याच्या नोंदी देण्यात आल्या आहेत़ यातून नोव्हेंबर महिन्यात सहा लाख लाभार्थीना रॉकेल दिल्याची माहिती आह़े विशेष म्हणजे जिल्ह्यात आजअखेरीस 63 हजार उज्ज्वला गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले आह़े जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून गेल्या महिन्यार्पयत 64 टँकरद्वारे रॉकेल पुरवठा करण्यात येत होता़ यातून 14 टँकर कमी करण्याचा निर्णय शासनस्तरावरुन घेण्यात आल्याने 48 किलोलीटर रॉकेल पुरवठा कमी झाला़ तरीही जिल्ह्यात अद्याप 6 लाख लाभार्थीना 50 टँकरद्वारे 600 किलोलीटर रॉकेलचा पुरवठा करणे सुरु आह़े गेल्या काही वर्षात लाभार्थीची संख्या झपाटय़ाने कमी होत असली तरी रॉकेल वितरणाचे आकडे जैसे थे असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या़ या तक्रारींमुळे तसेच रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाकडून पावले उचलण्यात येऊन टँकरची संख्या कमी करण्यात आली होती़ यानंतरही वितरण प्रणाली सुरळीत होईल अशी अपेक्षा होती़ परंतू गॅस कनेक्शन असतानाही लाभार्थीच्या नावे रॉकेल वितरण होत असल्याचे प्रकार सुरुच असल्याने टँकर कमी करण्याचा निर्णय केवळ दिशाभूल करणारा ठरत असल्याचे पुढे येत आह़ेविशेष म्हणजे तालुकास्तरावर वितरण होणा:या रॉकेल डेपोमधून लाभार्थीच्या घरांर्पयत जाणारे रॉकेलची केवळ कागदोपत्री नोंदणी असल्याने काही पुरवठादार त्याचा गैरफायदा घेत असल्याची माहिती आह़े पुरवठा विभागाने याबाबत तालुकास्तरावर सातत्यानु सूचना करुनही कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े ग्रामीण भागात एका शिधापत्रिकाधारकाला किमान 2 लीटर, दोन व्यक्ती असल्यास 3 लीटर तर तीनपेक्षा अधिक संख्या असलेल्या शिधापत्रिकाधारकांना 4 लीटर रॉकेल देण्याची पद्धत आह़े परंतू यात वेळावेळी कपात करुन रॉकेल पुरवठय़ाची कारणे दाखवून रॉकेल वितरण करण्यात येत असल्याची माहिती आह़े जिल्ह्यात रॉकेल वितरणासाठी 33 डेपोंची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आह़े या डेपोंमधून 30़50 पैसे दराने देण्यात येणारे रॉकेल लाभार्थीच्या घरांर्पयत पोहोचण्यास महिन्याचा कालावधी लागल्याचे अनेकवेळा प्रकाशात येऊनही योग्य ती कारवाई करण्यात येत नसल्याने लाभार्थी हैराण झाले आहेत़
63 हजार गॅस कनेक्शन तरीही 50 टँकर रॉकेल वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 12:50 PM