शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

64 पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित

By admin | Published: March 15, 2017 12:34 AM

आठ कोटींचे वीज बिल थकले : सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज प्रकल्पांवरही अंधार

प्रकाशा : विजेचे बिल थकीत झाल्याने प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजसह तालुक्यातील 64 पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने खंडित केला आहे. ज्या शासकीय कार्यालयांकडे वीज बिलांची थकबाकी आहे त्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभाग क्रमांक एकमध्ये येणारया शहादा तालुक्यातील 212 पाणीपुरवठा योजनांकडे आठ कोटी 94 लाख 39 हजार 484 एवढी रक्कम थकीत आहे. वारंवार नोटिसा देऊनही संबंधितांनी थकबाकीची रक्कम न भरल्याने 212 पैकी 64 पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा वीज कंपनीने खंडित केला आहे. विजेचे बिल व थकीत रक्कम वेळेवर भरली नाही तर ही मोहीम सुरूच राहणार आहे.प्रकाशा बॅरेजकडे 25 हजार तर सारंगखेडा बॅरेजकडे 53 हजार 220  रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. या दोन्ही बॅरेजेसचाही वीजपुरवठा वीज कंपनीने मंगळवारी खंडित केला. सद्यस्थितीत प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे सर्व दरवाजे बंद असून बॅरेज पाण्याने तुडूंब भरले आहेत. त्यातच अवकाळी पाऊस आला तर तापी नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीला पूर आल्यास वीजपुरवठय़ाअभावी एकही दरवाजा उघडणार नाही. त्यावेळी धोकेदायक स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे बॅरेज प्रशासनाने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रय} करण्याची गरज आहे.वीज कंपनीच्या शहादा उपविभाग क्रमांक एक अंतर्गत कोटय़वधी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. त्यातून फक्त 32 लाख 94 हजार रुपये वसूल झाले आहेत. कोटय़वधी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी वीज कंपनीकडून संबंधिताना नोटिसा पाठविल्या असून काहींचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. या उपविभागांतर्गत येणा:या शासकीय कार्यालयांनीही थकीत वीज बिल भरले नाही तर त्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.         वारंवार नोटिसा देऊनही थकीत          वीज बिल न भरणा:यांचा          वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना कार्यकारी अभियंता धनंजय भामरे व उपकार्यकारी अभियंता किशोर    गिरासे यांनी संबंधितांना दिल्या आहेत.पाणीपुरवठा योजना व प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेज प्रशासनासह शासकीय कार्यालयांना थकीत वीज बिल भरण्याबाबत वारंवार नोटिसा देऊनही थकीत बिल भरले जात नसल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.-धनंजय भामरे, कार्यकारी अभियंता, शहादा.प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज प्रशासनाला नियमानुसार वीज थकबाकी भरण्याविषयी नोटीस दिली आहे. त्यांनी थकबाकी न भरल्याने मंगळवारी दोन्ही बॅरेजचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.-किशोर गिरासे, उपकार्यकारी अभियंता, शहादा