तळोदा : राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेत तालुक्यातील सर्व 67 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला असून, त्याबाबतची कार्यवाही ग्रामपंचायतींनी सुरू केली आहे. शासनाच्या या अभियानातून लोकसहभाग महत्त्वाचा असल्याने गावक:यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जास्तीत जास्त लोकसहभागातून गावक:यांबरोबरच संबंधित पंचायतींना स्वयंपूर्ण करण्यासाठी इको व्हिलेज योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने स्मार्ट ग्राम योजना हा उपक्रम हाती घेतला आहे. या योजनेत संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यकक्षेतील गावांची सार्वजनिक स्वच्छता, गावाची पाणीपुरवठा योजना, पाणी व्यवस्थापन, पंचायतींची विविध करांची वसुली, अंगणवाडय़ा, शाळांची सजावट, ग्रामसभा, ग्रामसभेतील विविध विकासात्मक ठराव, गावातील विकासाच्या योजना अशी वेगवेगळी उपक्रमे राबवायची आहेत. याशिवाय वृक्षारोपण, वृक्षसंगोपन या उपक्रमांचाही समावेश आहे. इको व्हिलेजच्या धर्तीवर ही योजना असली तरी इको व्हिलेज केवळ वृक्षारोपणा पुरतीच मर्यादित आहे. तथापि या स्मार्ट ग्रामयोजनेत लोकसहभागातून गावाचा सर्वागीण विकासावर भर देण्यात आला आहे.तळोदा तालुक्यात स्मार्ट ग्राम अभियानात जवळपास सर्वच्या सर्व म्हणजे 67 ग्रामपंचायती सहभागी झाल्या आहेत. त्याबाबत कार्यवाही करून प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून ग्रामीण खेडी पुन्हा स्वच्छतेची कात टाकणार आहे. तथापि गावक:यांनीदेखील आपल्या उदासीनता झटकून शासनाच्या या स्तुत्य उपक्रमात मोठय़ा संख्येने सहभागी होण्याची आवश्यकता आहे. (तालुका प्रतिनिधी)गावाला मिळणार 10 लाखांचे बक्षीसग्रामीण खेडे स्वंयपूर्ण होण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या स्मार्ट ग्राम योजनेत तालुक्यातून पहिल्या आलेल्या ग्रामपंचायतीस शासनातर्फे 10 लाखांचे प्रथम बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासाठी निर्धारित केलेल्या 100 गुणांचे मूल्यांकन करण्यात येईल. सुरुवातीस ग्रामपंचायत स्वत: गुणांचे मूल्यांकन करेल. त्यानंतर दुस:या तालुक्यातील नेमलेली समिती मूल्यांकन करेल. जास्तीत जास्त गुण प्राप्त करणारी ग्रामपंचायत या बक्षिसास पात्र ठरून तिची जिल्हास्तरावर निवड करण्यात येईल. जिल्ह्यात प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीस 40 लाखांचे बक्षीस मिळणार आहे. गावांच्या विकासासाठी शासनाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असला तरी ही योजना प्रभावी व नियोजनबद्ध राबविण्याची गरज आहे. यासाठी यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष घालणे अपेक्षित आहे. अन्यथा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, इको व्हिलेजेस, तंटामुक्ती अशा योजनांसारखी गत होऊ नये. कारण या योजना केवळ औपचारिकता म्हणूनच राबविल्या जात होत्या. तशा व्यथादेखील गावक:यांनी बोलून दाखविल्या आहेत.
स्मार्ट ग्राम योजनेत 67 ग्रा.पं.चा सहभाग
By admin | Published: January 11, 2017 11:29 PM