शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नंदुरबार जिल्ह्यात अपंग युनिटच्या 71 शिक्षकांवर टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:26 PM

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेत बनावट नियुक्तीपत्राद्वारे सामावून घेतलेल्या 71 शिक्षकांसह संबधित अधिका:यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासंदर्भात चौकशी करून सचिवांकडे अहवाल सादर केला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शासनाने 15 वर्षापूर्वी शाळांमध्ये अपंग युनिट ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेत बनावट नियुक्तीपत्राद्वारे सामावून घेतलेल्या 71 शिक्षकांसह संबधित अधिका:यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासंदर्भात चौकशी करून सचिवांकडे अहवाल सादर केला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शासनाने 15 वर्षापूर्वी शाळांमध्ये अपंग युनिट सुरू केले होते. त्याअंतर्गत राज्यभरात शिक्षकांची भरती देखील झाली होती. मात्र, 2010 मध्ये शासनाने अपंग युनिट बंद करण्याचे आदेश दिले होते. या युनिटमधील राज्यभरातील 595 शिक्षकांचे समायोजन करण्याच्या सुचना जिल्हा परिषदांना त्यावेळी देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही जिल्हा परिषदांनी अशा शिक्षकांना आपल्या आस्थापनेखाली सामावून घेतले होते. परंतु त्यानंतरही वेळोवेळी शासनाकडून अशा शिक्षकांना सामावून घेण्याचे आदेश मिळत गेले. दोन वर्षापूर्वी देखील नंदुरबार जिल्हा परिषदेला असे आदेश मिळाले. त्यात कुठलीही शहनिशा न करता अनेक जणांना खिरापतीसारखी ऑर्डर वाटप करण्यात येवून त्यांना सामावून घेण्यात आले. आता संपुर्ण राज्यातच या बनावट नियुक्तींची चौकशी सुरू करण्यात आली असून नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत देखील 71 जणांना अशा प्रकारच्या बोगस नियुक्ती दिल्या गेल्या असल्याचे उघड झाले आहे.सीईओंनी घेतले मनावरया बोगस नियुक्तींबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मनावर घेतले होते. यापूर्वी जिल्हा परिषद सदस्यांनी देखील तक्रारी दाखल केल्या होत्या. माजी अध्यक्ष भरत गावीत यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी व सर्वसाधारण सभांमध्ये वेळोवेळी हा विषय लावून धरला होता. त्यानुसार सीईओ बिनवडे यांनी मागील फाईली काढून या प्रकरणाचा अभ्यास केला. त्यात त्यांना संशय आल्याने त्यांनी त्यात आणखी खोलवर जावून तपास केला.चौकशी समितीशिक्षण संचालकांनी यासंदर्भात जिल्हा परिषदेला चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार सीईओंनी चार सदस्यीय चौकशी समिती नेमली. चौकशी समितीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंधर पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे, शिक्षणाधिकारी अनिकेत पाटील यांचा समावेश होता. या समितीने सर्वच 112 शिक्षकांची चौकशी केली. त्यातील 71 शिक्षकांचे नियुक्तीपत्रावर शंका घेण्यात आली आहे. त्यांची नियुक्तीच बनावट कागदपत्राद्वारे करण्यात आल्याचेही जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा शिक्षकांवर आता टांगती तलवार कायम आहे.गुन्हे दाखलची कार्यवाहीबोगस कागदपत्राद्वारे नियुक्ती झाल्याचे स्पष्ट झाल्याने अशा शिक्षकांसह त्यांना नियुक्ती देणा:या संबधित अधिका:यांवरही गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख् कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन व इतर अधिकारी गुरुवारी पोलीस ठाण्यात जावून त्यांनी फिर्यादचे कागदपत्र सादर केले. एक, दोन दिवसात अधिकृत गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांतर्फे वर्तविण्यात आली.शक्यता शिक्षण वतरूळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे    जिल्हा परिषदेत अनेकांचे धाबे दणाणले आहे. काहींनी हे प्रकरण व चौकशी दडपण्याचाही प्रयत्न केला. परंतु शिक्षण संचालकांचे आदेश आणि सीईओंची खंबीर भुमिका यामुळे कुणाचीही डाळ शिजली   नाही.