शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

शहादा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींसाठी ७३.०९ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:27 AM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकशाहीतील पर्व म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकांकडे पाहिले जाते. या निवडणुका भविष्यातील जिल्हा परिषद विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीची ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकशाहीतील पर्व म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकांकडे पाहिले जाते. या निवडणुका भविष्यातील जिल्हा परिषद विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीची पर्वणीच असते. ग्रामपंचायत निवडणुका असल्या, तरी मिनी विधानसभा म्हणून याला संबोधले जात आहे. गेल्या दहा महिन्यांपासून कोविड १९ची संसर्गजन्य महामारी संपूर्ण देशभर पसरली असून, त्याची लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने व केंद्र शासनाने कोरोना महामारीपासून लोकांच्या संरक्षणाकरिता विविध उपाययोजना शासनानेे राबवल्या आहेत. याच दरम्यान तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आयोगाने घोषित केल्या होत्या. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर ग्रामपंचायत नागरिक, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांमध्ये जल्लोष निर्माण झालेला दिसून आला. निवडणुका म्हणजेे ही प्रचाराची परवणीच व काहींना विरंगुळा आहे. तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींपैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने, २१ ग्रामपंचायतींसाठी ४१ हजार ४०२ पैकी प्रत्यक्ष १५ हजार ६३१ पुरुष तर १४ हजार ६११ स्त्रिया असे एकूण ३० हजार २६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

ग्रामपंचायत निहाय सुरुवातीला एकूण मतदान झालेल्या मतदान व कंसात मतदानाची टक्केवारी अशी : कुकावल १,५५५ पैकी १,२९४ (८३.२२टक्के), कोठली त.सा. १,४८० पैकी १,१७८(७९.५९), कुऱ्हावद त.सा. ७८२ पैकी ५४५(६९.६९), कवठळ त.सा. ४८९ पैकी ४०१ (८२), तोरखेडा ३,६०६ पैकी २,२९७ (६३.७०), फेस १,७९८ पैैकी १,१३० (६२.८५), शेल्टी २,०१५ पैकी १,४९२ (७४.०४), टेंभे त.श. २५८ पैकी १८९ (७३.२६), मनरद १,३१५ पैकी ८८२ , डामरखेडा २,०२३ पैकी १,४७७ (७३.०१), बामखेडा त.त. २,४०० पैकी १,९८४ (८२.६०), पुसनद १,७८६ पैकी १,५४१ (७९.७६), सोनवद त.श. १,७८६ पैकी १,५५४ (८७.०१), टेंभे त. सा. (बु.) १,२४७ पैकी ६७५ (५४.१३), कानडी त.श. ६७६ पैकी ४८० (७१.०१), मोहिदे त.श. ५,१११ पैैकी तीन हजार ९३२ (७६.९३), सारंगखेडा सहा हजार तीनशे चारपैकी तीन हजार ८७७ (६१.५०), राणीपूर १,९४६ पैकी १,६९५ (८७.१०), कोटबांधणी १,०५९ पैकी ८५६ (८०.८३), नागझिरी १,२६५ पैकी ९२५ (७४.८४), असलोद २,३८२ पैकी १,८५८ (७८) असे एकूण ७३.०९ टक्के मतदान झाले.

मतदार संख्या झालेले मतदान

पुरुष - २१ हजार १२२, १५ हजार ६२१

स्त्री - २० हजार २८०, १४ हजार ६११

एकूण - ४१ हजार ४०२, ३० हजार २६२

टक्केवारी - ७३.०९ मतदारांनी मतदानाच्या आपला हक्क बजावला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकशाहीतील ही पर्वणीच म्हणावी लागेल. पाच वर्षांत एकदा मतदार व कार्यकर्ते १५ ते २० दिवस ग्रामपंचायत निवडणुकीला अनुसरून राजकीय तर्कवितर्क लावत असतात.

ग्रामपंचायतीच्या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालेले आहे. अनेकांचे राजकीय भवितव्य ठरवणारी निवडणूक ठरू पाहत आहे. अनेक ग्रामपंचायत उमेदवारांनी सामदामदंडचा परिपूर्ण वापर केलेला आहे. राजकीय दबावाचा लवलेशही अनेकांना अनुभवास मिळालेला आहे. नात्यागोत्याचे राजकारण, मित्रा-मित्रांमध्ये दुफळी ही निवडणुकीत अनुभवास मिळालेली आहे. या निवडणुकीत तरुणांचा प्रचारादरम्यान जेवढा सहभाग होता, त्यापेक्षा जास्त महिलांचा सहभाग दिसून आलेला आहे. मतदानाच्या दिवशीही महिलांची अनेक प्रभाग केंद्रांवर रागच राग दिसून आलेली आहे.

मतमोजणी दोन दिवसांवर आली असली, तरी अनेक ठिकाणी मातब्बर उमेदवारांनी सरपंच पदाचा दावेदार म्हणून आपल्या पॅनलच्या उमेदवारांशी आत्तापासूनच जवळीक साधत आहेत. कोण निवडेल, कोण पराभूत होईल, हे जरी दोन दिवसांनंतर ठरत असले, तरी प्रत्येक उमेदवाराला आपल्या विजयाची खात्री पटू लागलेली आहे. अनेकांनी गणपती पाण्यात ठेवून मानता मानलेल्या आहेत. सरपंचपदाच्या उमेदवारांनी तर आत्तापासूनच खेळी करण्यास सुरुवात केलेली आहे. राजकीय नेत्यांचा आशीर्वाद घेण्यास प्रारंभ केला आहे. भविष्यात ग्रामपंचायतीच्या विकासाचे ध्येय व ध्यास डोळ्यासमोर ठेवून, भावी सरपंचांनी आपल्या मनातील उमेदवारांशी संपर्क ठेवत आहे. गेल्या आठवडाभरापासून प्रचाराची रणभूमी थंडावली असली, तरी उमेदवार व कार्यकर्त्यांचे निवडणूक निकालाकडे लक्ष लागून आहे. अजूनही उत्साह कमी झालेला नाही. आपले पॅनल विजयी होणार, याची खात्री करून अनेकांनी आत्तापासूनच मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची खरेदी केलेली आहे. विजयी उमेदवारांनी मिरवणुकीची जय्यत तयारी सुरू केली असून, येत्या दोन दिवसांनंतर कोणता उमेदवार विजयी होईल व कोणाचे पॅनेल निवडेल, हे चित्र दुपारी दोन वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. यानंतर, खऱ्या राजकीय अस्तित्वाकडे उमेदवारांची सुरुवात होणार आहे.

शहादा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींपैकी मामाचे मोहिदेतर्फे शहादा, सोनवद, सारंगखेडा, बामखेडा त.त. या ग्रामपंचायतींकडे सर्वच राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे.