लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नवापुर उपजिल्हा रुग्णालयात सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. सर्वात आधी नवापूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ किर्तीलता वसावे व आरोग्य कर्मचारी बजरंग भंडारी यांना कोरोना लस देण्यात आली. शनिवारी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका,आशावर्कर अश्या ७८ जणांना लसीकरण देण्यात आले. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वात पहिली लस देण्याचा मान औषधनिर्माते बजरंग भंडारी यांना मिळाला आहे. सर्व नियमांचे पालन करून लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार सुरूपसिंग नाईक यांनी भेट देऊन डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले.लसीकरणासाठी ५ जणांचे पथक तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना लसीकरण दोन टप्प्यात दिली जाणार आहे. २८ दिवसांनी दुसरा ठोस दिला जाणार आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शशिकांत वसावे यांनी दिली.
नवापुरला घेतली ७९ जणांनी लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 12:27 PM