शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

चिंचपाडा येथे ८० हजारांची घरफोडीने उडाली खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 12:52 PM

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी :  नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील एका शिक्षकाच्या घरी सर्व कुटुंब वरच्या मजल्यावर झोपलेले असताना मध्यरात्रीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी :  नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील एका शिक्षकाच्या घरी सर्व कुटुंब वरच्या मजल्यावर झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडी-कुलूप तोडून ८० हजार रुपयांची रोख रक्कमसह  साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना काल मध्यरात्री घडली.  तालुक्यातील चिंचपाडा येथील आदर्श शिक्षक कॉलनीतील माध्यमिक शिक्षक प्रकाश मुझगे यांच्या घरातील सर्वजण वरच्या मजल्यावर झोपले होते. यावेळी चोरट्यांनी तळघरातील मुख्य दाराचे कुलूप-कडी तोडून घरात प्रवेश केला. घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरातील कपाटाच्या तिजोरीचा दरवाजा तोडून २२ हजार रुपये रोख, लॅपटॉप, साड्या, चांदीचे दागिने, असा एकूण जवळपास ८० हजाराचा माल लंपास केला आहे. यावेळी घरात ठेवलेले काजू-बदामवर देखील चोरट्यांनी ताव मारला आहे. काजू बदाम खात चोरट्यांनी चोरी करून पसार झाल्याचे चर्चा होत आहे. या परिसरातील ही पाचवी चोरीची घटना आहे. चिंचपाडा पोलिसांना रात्री गस्त घालण्याची वारंवार विनंती करून देखील परिसरात पोलिसांकडून रात्री पेट्रोलिंगकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही असा आरोप होत आहे. चोरीच्या घटनेची सकाळी पाच वाजता चिंचपाडा पोलिसांना माहिती देऊन देखील आठ वाजता सदर घटनेची दखल घेतली.  या घटनेची पोलिसांनी तातडीने चौकशी करून कारवाई करावी तसेच परिसरात रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची मागणी पोलिसांना नागरिकांनी केली आहे.