लोकमत ऑनलाईननंदुरबार : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडून गेल्या अकरा वर्षात 801 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत़ तर, 147 प्रकरणे आजतागायत प्रलंबित आह़े या दरम्यान, तक्रार निवारण केंद्राकडे एकूण 948 प्रकरणे दाखल करण्यात आली होती़ दरम्यान, ग्राहकांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात अजूनही आपले अधिकार, हक्क याबाबत जागृकता निर्माण झाली नसल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आह़े एखादी वस्तू खरेदी करताना फसवणूक झाल्यास याबाबत तक्रार कोठे करावी याचीही अनेकांना माहिती नसल्याचे या वेळी सांगण्यात आल़े त्यामुळे ग्राहक मंचाबाबत अधिक व व्यापक प्रमाणात जनजागृती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे 2010 मध्ये 61, 2011 - 55, 2012 - 53, 2013 - 48, 2014 - 46, 2015 - 82, 2016 - 71, 2017 - 81 तर 2018 मध्ये फेब्रुवारीर्पयत 63 प्रकरणे दाखल करण्यात आले आहेत़ त्याचप्रमाणे 2006 ते आतार्पयत बँकींग क्षेत्र म्हणजेच पतपेढी, बँका, पतसंस्था आदींसदर्भात 411 पैकी, 375 प्रकरणे निकाली काढण्यात आले तर 36 प्रलंबित आहेत़ विमा प्रकरणातील 154 पैकी 123 प्रकरणे निकाली तर 31 प्रलंबित आहेत़ इलेक्ट्रीसीटी प्रकरणातील 49 पैकी 39 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून 10 प्रकरणे प्रलंबित आहेत़ आरोग्य विभागासंदर्भातील 12 पैकी 10 प्रकरणे निकाली काढण्यात आली तर 2 प्रकरणे प्रलंबित आहेत़ अन्य प्रकारांमध्ये 232 प्रकरणांपैकी 215 प्रकरणे निकाली तर 17 प्रलंबित आहेत़
नंदुरबार ग्राहक तक्रार केंद्रात अकरा वर्षात 801 प्रकरणांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:08 PM