लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : वीज वितरण कंपनीकडून तालुक्यातील ग्रामपंचायतींना नोटिसा देऊनही पाणी योजना व पथदिव्यांच्या वीजबिलाची थकीत रक्कम जमा न केल्याने 229 पथदिवे आणि 86 पाणी पुरवठा योजना यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या नोटिसा काढण्यात आल्या आहेत़ तालुक्यात 10 कोटी 30 लाख रूपयांच्या वीज बिलाची रक्कम थकीत आह़े तालुक्यात बुधवारपासून वीज कंपनीच्या धडगाव वीज उपविभाग कार्यालयाकडून नोटिसा देण्याची कारवाई सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली असून काही गावांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई करण्यात आल्याने तेथे पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आह़े धडगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीकडे पाणी योजना व पथदिवे यांच्या थकीत बिलाची रक्कम ही 2 ते 10 लाख एवढी असल्याची माहिती देण्यात आली आह़े कारवाई थांबवण्यासाठी ग्रामपंचायती पाठपुरावा करत असून त्यांच्या पाठपुराव्याला यश येण्याची चिन्हे कमीच असल्याची माहिती देण्यात आली आह़े संबधित ग्रामंपंचायतींची वार्षिक करवसुली ही 50 टक्क्यांपेक्षा कमीच असल्याने यंदाच्या वर्षात त्यांच्याकडून थकबाकीचा भरणा होण्याबाबत शंका उपस्थित होत आह़े 31 मार्चपूर्वी नोटिसा बजावलेल्या सर्वच पाणी योजनांची वीज पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे म्हटले आह़े
धडगाव तालुक्यात 86 पाणी योजना वीज कंपनीच्या ‘रडार’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:34 PM