शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

धडगावमार्गे गुजरातमध्ये जाणारा ट्रकसह 89 लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 11:45 AM

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा/ब्राम्हणपुरी : धडगावमार्गे गुजरातमध्ये जाणारा तब्बल 71 लाख 80 हजार 800 रुपये किंमतीचा मध्यप्रदेश बनावटीचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी सकाळी पिंप्री, ता.शहादा शिवारात ताब्यात घेतला. नाशिक येथील भरारी पथकाने ही कारवाई केली. 17 लाखांच्या ट्रकसह एकुण 89 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सरदारलाल मांगीलाल सूर्यवंशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा/ब्राम्हणपुरी : धडगावमार्गे गुजरातमध्ये जाणारा तब्बल 71 लाख 80 हजार 800 रुपये किंमतीचा मध्यप्रदेश बनावटीचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी सकाळी पिंप्री, ता.शहादा शिवारात ताब्यात घेतला. नाशिक येथील भरारी पथकाने ही कारवाई केली. 17 लाखांच्या ट्रकसह एकुण 89 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सरदारलाल मांगीलाल सूर्यवंशी यास ताब्यात घेण्यात आले आहे.मध्यप्रदेश बनावटीचे मद्य नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात राज्यात मोठय़ा प्रमाणावर विक्री होते. जिल्ह्यातील चोरटय़ा मार्गाने देखील अशा मद्याची मोठय़ा प्रमाणावर वाहतूक होते. पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेळोवेळी कारवाई करून मद्यसाठा जप्त केलेला आहे. परंतु गुरुवारी पहाटे जप्त करण्यात आलेला मद्यसाठा आजर्पयतचा सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक येथील भरारी पथकाने सापळा लावून ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, मध्यप्रदेश बनावटीची आणि त्याच राज्यात विक्रीचा परवाना असलेले मद्य धडगावमार्गे गुजरातमध्ये जाणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाला मिळाली होती. विभागीय उपायुक्त प्रसाद सुव्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाने बुधवार, 7 रोजी रात्रीपासून खेतिया-शहादा व शहादा-धडगाव मार्गावर सापळा लावला होता. गुरुवार, 8 रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास धडगाव रस्त्यावर पिंप्रीफाटा नजीक दहा चाकी अवजड वाहन (क्रमांक एमपी 09 एचएफ 2625) आल्यावर संशयावरून पथकाने वाहनाला थांबवून वाहनाची तपासणी केली. वाहनात मोठय़ा प्रमाणावर मद्यसाठा असल्याचे निष्पन्न झाले. ट्रक व मद्यसाठा आणि सरदारलाल सूर्यवंशी यांना ताब्यात घेण्यात   आले.ट्रकमध्ये बॉम्बे स्पेशल व्हिस्कीचे 90 बॉक्स त्यांची किंमत पाच लाख 61 हजार 500 रुपये. त्याच कंपनीचे 180 मि.ली.चे एक हजार दोन बॉक्स त्याची किंमत 62 लाख 52 हजार 480 रुपये. याशिवाय आठ बॉक्स त्यांची किंमत 49 हजार 920 रुपये. लीमाऊंट प्रिमीयम स्ट्राँग बिअरचे 500 मि.ली.चे 110 बॉक्स त्यांची किंमत तीन लाख 16 हजार 800 रुपये असा एकुण 71 लाख 80 हजार 800 रुपयांचे मद्य व दहा चाकी ट्रक   त्याची किंमत 17 लाख रुपये असा एकुण 88 लाख 80 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरिक्षक एम.बी.चव्हाण, एन.बी.दहिवडे, दुय्यम निरिक्षक वाय.आर.सावखेडकर, आर.आर.धनवटे, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दिपक आव्हाड, विठ्ठल हाके, अमोल पाटील यांनी केली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सरदारलाल मांगीलाल सूर्यवंशी याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमचे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरिक्षक एम.बी.चव्हाण करीत आहे.