भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : परराज्यातून चोरट्या मार्गाने विक्रीसाठी आणल्या जाणाऱ्या अवैध दारुसह गावठी हातभट्टीच्या दारुमुळे जिल्ह्यातील परवानधारक मद्याची विक्री मंदावल्याचे सातत्याने सांगण्यात येते़ परंतू याला २०१९ मध्ये छेद देण्यात ‘मद्यपी’ यशस्वी झाले असून वर्षभरात तब्बल ५९ लाख लीटर देशी-विदेशी मद्य आणि बियरची विक्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ यातून शासनाचा महसूल वाढल्याचे सांगण्यात आले आहे़शासनाचा महसूल वाढवण्यात इतर करांच्या बरोबरीने मद्यविक्रीचा मोठा वाटा आहे़ याला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणारी चोरटी मद्य वाहतूक सुरुंग लावत होती़ यातून राज्य उत्पादन शुल्क विभागाने सातत्याने मद्य तस्कराांवर केलेल्या कारवायांमुळे स्थानिक विक्रेत्यांकडे मिळणाºया मद्याची विक्री वाढून त्यातून विभागाचा महसूलही वाढला आहे़ विशेष म्हणजे २०१८ च्या तुलनेत २०१९ या वर्षात देशी दारुच्या विक्रीत ३९ टक्के, विदेशी मद्याच्या विक्रीत १३ टक्के, बियरच्या विक्रीत ९ टक्के वाढ झाली आहे़ दुसरीकडे मात्र परवानाधारक वाईनच्या विक्रीत मात्र घट आली असून २०१८ च्या तुलनेत तब्बल ८८ टक्के तोटा आल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे़ जिल्ह्यात वाढीस लागलेल्या मद्यविक्रीतून उलाढाल होऊन त्या-त्या व्यावसायिकांसह शासनाचा महसूलही वाढला असल्याचे सांगण्यात आले आहे़डिसेंबर वर्षभराच्या तुलनेत एकट्या डिसेंबर महिन्यात सर्वच प्रकारच्या मद्याच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले असून यात ३० आणि ३१ डिसेंबर या दोन दिवसांनी मोठा हातभार लावल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे़जिल्ह्यात परवानाधारक देशी दारु विक्रीची २४ दुकाने आहेत़ ११ वाईन शॉप, १०० परमीटरुम बियरबार आणि २० बियरशॉपी आहेत़ या सर्व ठिकाणांवरुन १ एप्रिल ते ३१ डिसेंबर या काळात ५८ लाख ९४ हजार ५८ बल्क लीटर देशी-विदेशी दारु आणि बियरची विक्री झाली आहे़प्राप्त माहितीनुसार एप्रिल २०१९ मध्ये २ लाख १६ हजार ८२० बल्क लीटर, मे महिन्यात २ लाख ७७ हजार २९८, जून महिन्यात २ लाख ३३ हजार ५७७, जुलै-२ लाख ६२ हजार ५०९, आॅगस्ट-२ लाख २६ हजार ३६३, सप्टेंबर-२ लाख ५ हजार २५३, आॅक्टोबर २ लाख ५६ हजार ६०३, नोव्हेंबर-२ लाख ३२ हजार ६५३ तर डिसेंबर महिन्यात २ लाख ५९ हजार १५८ बल्क लीटर देशी दारुची विक्री झाली आहे़जिल्ह्यातून एप्रिल २०१९ मधून तब्बल १० लाख ८२ हजार ६२५ बल्क लीटर विदेशी मद्याची विक्री झाली होती़ यात सर्वाधिक १ लाख ३९ हजार ३६१ बल्क लीटर मद्य हे डिसेंबर महिन्यात विक्री करण्यात आले आहे़२०१९ मध्ये २६ लाख १२ हजार ३९८ बल्क लीटर बियरची विक्री झाली आहे़ यात सर्वाधिक ५ लाख १६ हजार ३६७ बल्क लीटर मे महिन्यात तर ३ लाख ६६ हजार १७ बल्क लीटर बियरची विक्री जूनमध्ये झाली़ त्यानंतरही बियरच्या विक्रीत सातत्याने वाढ झाली आहे़२०१८ मध्ये जिल्ह्यात १६ लाख ४६ हजार ९ बल्क लीटर देशी मद्य विक्री झाले होते़ त्यात तुलनेत २०१९ मध्ये ५ लाख ६७ हजार ६३३ बल्क लीटरने वाढ होऊन जिल्ह्यात देशीच्या विक्रीत ३५़४ टक्के वाढ झाल्याची माहिती आहे़विदेशी मद्यही २०१८ च्या तुलनेत २ लाख ३६ हजार ४४९ लीटर अधिक विक्री करण्यात आली होती़ यातून २७ टक्के विदेशी मद्य विक्री वाढली़४एकीकडे देशी-विदेशी दारु आणि बियर विक्री वाढली असताना २०१९ मध्ये केवळ २६ हजार ७९३ बल्क लीटर दारुची विक्री झाली़ यातून शासनाच्या महसूलात ४३ टक्के घट झाली़
रंगिल्यांच्या मैफिलीतून संपली ५९ लाख लीटर ‘दारु’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 12:20 PM