ठळक मुद्दे100 मिटरमध्ये आढळली फेरफार
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विजेसंदर्भात तक्रार निवारण कक्ष किंवा ग्राहक गा:हाणे निवारण मंच यांच्याकडे न्याय न मिळाल्यास थेट विद्युत लोकपालाकडे धाव घेता येणार आहे. तेथे दोन महिन्याच्या आत तक्रार निकाली निघणार असल्याची माहिती विद्युत लोकपाल आर.डी.संख्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जिल्ह्यात ग्रामपंचायत नळ पाणीपुरवठाच्या 97 योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली. विद्युत लोकपाल आर.डी.संख्ये यांच्या उपस्थितीत नंदुरबार सर्कलमधील ग्राहकांच्या तक्रारींसदर्भात संवाद घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता आर.एम.चव्हाण, कार्यकारी अभियंता अनिल पाटील, लोकपालचे सदस्य दिलीप डुंबरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पंजाबराव बोरसे, एम.बी.गांगोडे आदी उपस्थित होते. 34 कोटींची थकबाकीनंदुरबार सर्कलमध्ये 853 ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची तब्बल 34 कोटी 33 लाख 76 हजार रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी न भरणा:या योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. त्यानुसार महिनाभरापूर्वी 97 योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडील एकुण थकबाकी पाच कोटी दोन लाख 33 हजार इतकी होती.नंदुरबार उपविभागाअंतर्गत एकुण 462 ग्रामिण पाणी पुरवठा योजना आहेत. त्यांच्याकडे 16 कोटी सहा लाख 24 हजार 886 रुपये थकबाकी आहे तर शहादा उपविभागात 391 योजनांची 18 कोटी 27 लाख 51 हजार 916 रुपये थकबाकी आहे. यासंदर्भातील योजनांची यादी जिल्हाधिका:यांकडे देण्यात आली असून एकाच वेळी एवढय़ा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शन घेतले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.ऑनलाईवर भरवीज कंपनीचा कारभार आता पेपरलेसकडे जात आहे. त्यामुळे विविध मोबाईल अॅप्स, वेबसाईट, ऑनलाईन या माध्यमातून कारभार सुरू आहे. ग्राहकांना वीज बील भरण्यासाठी अॅप्स आणि ऑनलाईनचा पर्याय आहे. मिटर रिडिंगच्या तक्रारी कमी करण्यासाठी मोबाईलनंबर नोंद केल्यास त्या मोबाईलवर मिटर रिडींगची नोंद पाठविली जाते. बीलचा मेसेज देखील मोबाईलवर दिला जातो. मोबाईलवर मेसेज दाखवून बील भरणा केंद्रांवर बिल स्विकारले जाते. त्यामुळे तक्रारींचे प्रमाण यापुढे कमी राहणार असल्याचेही संख्ये यांनी यावेळी सांगितले. 97 पाणी योजनांची वीज खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 11:30 AM