शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

नवापुरात महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

By भूषण.विजय.रामराजे | Published: May 12, 2023 6:31 PM

धुळे ते नवापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर सध्या रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे.

नंदुरबार : नवापूर शहरात सुरू असलेले धुळे-सूरत राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पाडण्याच्या उद्देशाने महामार्ग विभाग आणि कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालून धक्काबुक्की करणाऱ्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. धुळे ते नवापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर सध्या रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे.

गुरुवारी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीचे अभियंता अरुण कुमार मंडल, मशीन ऑपरेटर पप्पू कुमार पंडित आणि मजूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर नवापूर शहर परिसरात रस्ता काम करत असताना त्याठिकाणी मनीष ओमप्रकाश अग्रवाल (४५) रा. चिंचपाडा ता. नवापूर हा आला. याठिकाणी सुरू असलेले काम बंद करण्याचे सांगून मनीष अग्रवाल याने अभियंता आणि मजूर यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान अभियंता आणि मजूर यांनी ह्या कामासोबत तुमचा काय संबंध अशी विचारणा केल्यावर मनीष अग्रवाल याने अभियंता आणि मजुरांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली होती.

यातून रस्ता निर्मितीचे सुरू असलेले काम बंद पडले होते. याप्रकरणी रात्री उशिरा यशोदीप उमेश पाटील यांनी नवापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मनीष ओमप्रकाश अग्रवाल याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी